पाबळला जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:12 IST2021-05-25T04:12:39+5:302021-05-25T04:12:39+5:30

शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथे शिक्रापूर पोलिसांनी अवैधरीत्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून एकूण १७ ...

Pabal raids gambling dens | पाबळला जुगार अड्ड्यावर छापा

पाबळला जुगार अड्ड्यावर छापा

शिक्रापूर : पाबळ (ता. शिरूर) येथे शिक्रापूर पोलिसांनी अवैधरीत्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून एकूण १७ जणांवर कारवाई करत सुमारे १७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शिक्रापूर पोलिसांना पाबळ येथे काही व्यक्ती तीन पत्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. येथे काही व्यक्ती जुगार खेळत असल्याचे दिसले. पोलीस आल्याची चाहूल लागताच अनेकांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी सर्वाना ताब्यात घेतले. या प्रकरणी युवराज बगाटे, कैलास बांगर यांच्यासह १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून जुगार साहित्य, रोख रक्कम, वाहने असा सर्व मिळून तब्बल १७ लाख ८५ हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Web Title: Pabal raids gambling dens