पुणे : कोरोनाचा विषाणुचा विळखा अधिक घट्ट होऊ लागल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीतील ऑक्सिजन पाईपलाईनचे काम विक्रमी वेळेत पुर्ण केले आहे. तसेच चार मजल्यांवरील कोरोनासाठी आवश्यक सुविधाही महिनाभरात सज्ज केल्या आहेत. तब्बल एक तपाहून अधिक काळ या इमारतीचे काम सुरू आहे. पण कोरोनाने प्रशासनाला खडबडून जागे केल्याचे या कामावरून स्पष्ट झाले आहे.ससून रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे काम २००८ पासून सुरू आहे. पण अपुरा निधी, निविदा प्रक्रियेतील विलंब, कामातील दिरंगाई अशा विविध कारणांमुळे या अकरा मजली इमारतीमध्ये १२ वषार्नंतरही रुग्णसेवा सुरू झाली नव्हती. इमारती बांधून उभी असली तरी आतील आवश्यक सोयी-सुविधांसाठी अजूनही किमान वर्षभराचा कालावधी लागण्याची शक्यता होती. पण कोरोना विषाणुचा प्रभाव वाढू लागल्यानंतर प्रशासनाला या इमारतीची आठवण झाली. जिल्हा प्रशासनाने तातडीने नवीन इमारतीला कोविड रुग्णालय म्हणून मान्यता देत तिथे आवश्यक सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महिनाभरापुर्वी कामाला सुरूवात झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या खांद्यावर ही जबाबदारी असल्याने अधिकाºयांनी याचे गांभीर्य ओळखून आधीपासून साफसफाई व इतर कामाला सुरूवात केली होती. रुग्णालयामध्ये तातडीने अतिदक्षता विभाग व विलगीकरण कक्ष तयार करण्याचा निर्णय झाला. यामध्ये महत्वाचे काम होते ते मेडिकल गॅस पाईपलाईन म्हणजे ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रणेचे.
ससूनमधील ऑक्सिजन पाईपलाईनचे सहा महिन्याचे काम झाले फक्त अकरा दिवसांत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2020 17:04 IST
कोरोनाने शासन खडबडून जागे
ससूनमधील ऑक्सिजन पाईपलाईनचे सहा महिन्याचे काम झाले फक्त अकरा दिवसांत
ठळक मुद्देकोरोना विषाणुचा प्रभाव वाढू लागल्यानंतर प्रशासनाला या इमारतीची आठवण