लग्नासाठी ठेवलेल्या पैशातून घेतले ऑक्सिजन सिलिंडर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:10 IST2021-05-14T04:10:42+5:302021-05-14T04:10:42+5:30
पुणे : दुसऱ्या लाटेत अनेकांना ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे लोहगावातील तरुणांनी पुढाकार घेत रुग्णांपर्यंत प्राणवायू पोहोचवण्याचे ...

लग्नासाठी ठेवलेल्या पैशातून घेतले ऑक्सिजन सिलिंडर
पुणे : दुसऱ्या लाटेत अनेकांना ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. ऑक्सिजनचा तुटवड्यामुळे लोहगावातील तरुणांनी पुढाकार घेत रुग्णांपर्यंत प्राणवायू पोहोचवण्याचे काम सुरू केले आहे. या तरुणांपैकी प्रशांत जगताप यांनी भावाच्या लग्नासाठी जमविल्या साडेतीन लाख रुपयांचे ऑक्सिजन सिलिंडर विकत घेऊन ते गरजू रुग्णाना पुरविले आहे.
प्रशांत जगताप यांचे भाऊ सौरभ यांचे लग्न होते. त्याच्या लग्नासाठी ३ लाख ५० हजार खर्च करण्याचा विचार होता. पण सध्याची परिस्थिती पाहून हे पैसे समाजोपयोगी कामासाठी वापरावेत असे ठरवले. त्यांनी या पैशातून ऑक्सिजनचे ३६ सिलिंडर विकत घेतले. नागरिकांना ऑक्सिजन पुरवठा करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत त्यांना २५ रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. या कामात त्यांना अविनाश पोथवडे, सौरभ जगताप, दत्तात्रय जाधव, विश्वजित पोतेकर आदी सहकार्य करीत आहेत.
मागच्या आठवड्यातअशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी प्रशांत जगताप यांची आत्या कोरोनामुळे गंभीर अवस्थेत होती. त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. त्यावेळी जगताप यांनी खूप प्रयत्न करूनही बेड मिळत नव्हता. अखेर उशीर झाल्याने आत्याने प्राण सोडला. म्हणून लोकांनाही अशा अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. समाजासाठी आपणही काहीतरी देणं लागतो. या उद्देशाने हा उपक्रम चालू केला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सिलिंडरची संख्या १०० वर पोहोचवण्याचा मानस
पुण्यात अजूनही कोरोना संसर्ग वेगाने वाढत आहे. आता आमच्याकडे ३६ सिलिंडर आहेत. काही संस्थांनी आमच्याशी संपर्क साधला आहे. सिलिंडर घेण्यासाठी त्यांनी आर्थिक साहाय्य करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ३६ हा आकडा लवकरच १०० किंवा त्यापेक्षा जास्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे.