शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगवीत कामगारानेच मालकाचा खून केल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 15:35 IST

सांगवी येथील समर्थनगर येथे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास एका ४० वर्षीय कैलास राणोजी तौर याचा मृतदेह घरातील स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळयात पडलेला आढळून आला होता.

ठळक मुद्देशिरीष वर्मा (वय ३३,रा.पिंपळे निलख) या आरोपीला खून प्रकरणी अटक

पिंपरी : सांगवी येथील समर्थनगर येथे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ४० वर्षीय कैलास राणोजी तौर याचा मृतदेह घरातील स्वच्छतागृहात रक्ताच्या थारोळयात पडलेला आढळून होता. हा खुनाचा प्रकार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. कैलास तौर या फॅब्रिकेशन व्यावसायिकाने त्याच्या वर्क्सशॉपमध्ये काम करणाऱ्या कामगाराच्या पत्नीवर अतिप्रसंग केल्याने कामगाराने रागाच्या भरात मालकाला मारहाण केली. या मारहाणीत तौर याचे डोके भिंतीवर आपटले, त्यात त्याचा मृत्यू झाला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. शिरीष वर्मा (वय ३३,रा.पिंपळे निलख) या आरोपीला खून प्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फॅब्रिकेशन व्यवसाय असलेल्या तौर याने पत्नी,मुले यांना गावी सोडले. मूळ गाव गेवराई जिल्हा बीड येथे पत्नी व मुलांना सोडून आल्यानंतर तौर सांगवी समर्थनगर येथील घरी एकटेच होते. त्यांनी रविवारी रात्री त्यांच्याबरोबर काम करणारा कामगार शिरिष वर्मा याला कु टुंबासह जेवणासाठी घरी बोलावले. रात्री तौर यांच्या घरी पार्टी झाली. मद्यप्राशन,जेवण केल्यानंतर सर्वांनी तौर यांच्या घरीच झोपण्याचे ठरविले. वर्मा पत्नीसह तौर यांच्या घरी मुक्कामी थांबले. रात्री तौर यांनी वर्मा यांच्या पत्नीवर अतिप्रसंग केला. पत्नीचा आरडाओरडा ऐकु आल्याने वर्मा यांना जाग आली. रागाच्या भरात वर्मा याने तौर यांना मारहाण केली. तसेच त्यांचे डोके भिंतीवर आदळले.जबरी मार लागल्याने तौर तेथेच कोसळले. तौर यास रक्ताच्या थारोळ्यात आहे तसेच ठेऊन वर्मा पत्नीला घेऊन रात्रीच तौर याच्या घरातून बाहेर पडले.सकाळी नेहमीप्रमाणे फॅब्रिकेशन वर्कशॉपवर एक कामगार आला. वर्क्सशॉप खुले नसल्याने तो मालक तौर राहत असलेल्या ठिकाणी त्यांच्या घरी गेला. त्यावेळी ही बाब त्याच्या निदर्शनास आली. याबाबत पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी वर्मा तसेच त्याच्या पत्नीकडे सखोल चौकशी केली, त्यावेळी वर्मा याने खुनाची कबुली दिली. सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय चांदखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक ननावरे, अलका सगर, फौजदार मधुमती शिंदे, शिरिष राऊत,शंकर जाधव, सुरेश खांडेकर, रोहिदास बोहले, नितीन दांगडे, कैलास केंगळे, दिपक भिसे यांच्या पथकाने आरोपीला २४ तासाच्या आत जेरबंद केले.  

टॅग्स :SangviसांगवीPuneपुणेCrimeगुन्हाPoliceपोलिसRapeबलात्कार