शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील संतापजनक घटना; चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला खायला लावले ब्लेडचे तुकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2023 18:26 IST

महिलेच्या गळ्यामध्ये गंभीर जखमा झाल्याने वैद्यकीय तपासणीत हा सगळा प्रकार समोर आला

शिवणे : चारित्र्याच्या संशयावरुन पुण्यातील शिवणे भागात नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. चारित्र्यावर संशय घेत एकाने त्याच्या पत्नीला औषधांच्या गोळ्यांमधून ब्लेडचे तुकडे गिळायला लावण्याची अत्यंत क्रूर घटना शिवणे परिसरात घडली आहे. याबाबत दिलेल्या तक्रारीवरून सोमनाथ साधु सपकाळ (वय ४५ रा. समर्थ टेरेस, कामठे वस्ती, शिवणे, पुणे) याच्या विरोधात त्याची पत्नी छाया सोमनाथ सपकाळ (वय ४१) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यामध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न, कौटुंबिक हिंसाचार कायद्यासह  विविध कलमांखाली तक्रार दिली आहे. पुण्यातील शिवणे गावामध्ये हा प्रकार घडला असून ४१ वर्षीय पीडित महिलेने यासंदर्भात उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून हे अमानुष कृत्य करणाऱ्या सोमनाथ सपकाळ याला अटक केली आहे.

उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा  प्रकार ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होता. गेल्या दोन महिन्यांपासून सपकाळ दाम्पत्यामध्ये अनेक वाद-विवाद सुरू होते. सोमनाथ हा अनेक वेळा त्याच्या पत्नीवर संशय घ्यायचा त्याच मुद्यावरून त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोमनाथने त्याच्या पत्नीला कॅल्शिअमच्या कॅप्सूल्स खाण्यासाठी दिल्या. ज्यामध्ये त्याने अगोदरच ब्लेडचे तुकडे टाकले होते. आणि ते तिला खायला दिले. तोंडात ब्लेडचे तुकडे तिला टोचू लागले, धारदार तुकड्यामुळे तोंडातून रक्त येऊ लागले, त्यामुळे त्याच्या पत्नीने त्या गोळ्या आणि ब्लेडचे तुकडे थुंकून टाकण्याचा प्रयत्न केला. पण क्रूर सोमनाथने तिचे काहीच न ऐकता तिला ते तुकडे तसेच गिळायला लावले. त्यामध्ये पीडित महिलेच्या गळ्यामध्ये गंभीर जखमाही झाल्या. त्यांनी वैद्यकीय तपासणी केली असता हा सगळा प्रकार समोर आला. पीडित महिलेने नराधम पतीविरोधात उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आरोपी सोमनाथला अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभांगी पवार करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीhusband and wifeपती- जोडीदारWomenमहिला