शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! बापाचे मुलीबरोबर अश्लील कृत्य; अल्पवयीन मुलींवरील विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ

By नम्रता फडणीस | Updated: April 30, 2024 15:34 IST

शहरात एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन विनयभंगाच्या घटना

पुणे : शहरात गेल्या काही दिवसात अल्पवयीन मुलींवरील विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी तीन विनयभंगाच्या घटना घडल्या असून, त्यातील एका घटनेत बापानेच मुलीबरोबर अश्लील कृत्य केल्याचे समोर आले आहे.

पहिली घटना सदाशिव पेठ भागातील एका सोसायटीमध्ये सोमवारी ( दि. २९) घडली. आरोपीने १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला शाळेतील वर्कशॉप करिता लागणारे साहित्य खरेदी करण्याकरिता रविवार पेठेत नेले. त्यानंतर त्याचा जेवणाचा डबा घेण्याचा बहाणा करून मुलीला त्याच्या घरी नेले. तिच्याशी जवळीक साधून मला किस देतेस का? असे म्हटल्याने मुलीने तुम्हाला बायको आणि बाळ असल्याचे सांगितले. मात्र माणसाला फिलिंग असल्याचे सांगत त्याने मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी मंगेश गायकवाड या आरोपीवर विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे भा.दं वि. कलम ३५४ आणि ३५४ ( अ) आणि पोस्कॉ ८ व १२ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मांजरी बुद्रुक येथील पीडित मुलीच्या राहत्या घरी जाऊन आरोपीने विनयभंग केल्याची दुसरी घटना घडली. पीडित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निखिल शिरीष थोरात ( वय १९ ) असे मुलाचे नाव आहे. फिर्यादीचे आई वडील दोघेजण कामानिमित्त घराबाहेर गेले होते. फिर्यादीचा भाऊ हा पाणी आणण्याकरिता घराबाहेर गेला होता. शेजारी राहणारा ओळखीचा मुलगा मुलीच्या घराच्या दरवाज्यापाशी आला आणि तू मला खूप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे म्हणाला. तेवढ्यात फिर्यादीचा भाऊ तिथे आल्याने आरोपी पळून गेला. आरोपी सातत्याने फिर्यादीचा पाठलाग करायचा. माझ्याशी लग्न कर तुला सुखात ठेवेन असे सातत्याने म्हणत असल्याने तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिस-या घटनेत बापानेच मुलीबरोबर अश्लील कृत्य केल्याने बापाविरद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईनेच समर्थ पोलीस स्टेशनमध्ये यासंबंधी फिर्याद दिली आहे. नवरा दारू पिऊन मुलीला मारहाण करीत असे असेही फिर्यादीत म्हटले आहे.

टॅग्स :PuneपुणेMolestationविनयभंगWomenमहिलाPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी