शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

राजगुरुनगरमध्ये कचऱ्याच्या समस्येविषयी तरुणाईचा उद्रेक! नगरपरिषदेच्या दारात टाकला कचरा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 12:24 IST

प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन तीव्र आंदोलन छेडण्यात

ठळक मुद्दे मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी यांनी येत्या चार दिवसांत कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन

राजगुरुनगर: नगरपरिषद हद्दीमधील कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. खेड पोलीस स्टेशनच्या मागे रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे निदर्शनास आल्यानंतर राजगुरुनगरमधील अनेक तरुणांनी एकत्र येऊन नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांना कचरा उचलण्यासंबंधीचे निवेदन दिले होते. सदर निवेदनाला नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवण्यात आली. 

"आम्ही राजगुरुनगरकर" वासीयांच्या वतीने आज कचऱ्याच्या गाड्या कचरा डेपोमध्ये खाली न करता राजगुरुनगर नगरपरिषदेच्या दारात खाली करून कचऱ्याचा ढीग लावण्यात आला. मुजोर प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन तीव्र आंदोलन छेडण्यात आले. 

यावेळी मुख्याधिकारी, आरोग्य अधिकारी यांनी येत्या चार दिवसांत कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. सदर कचऱ्याची समस्या चार दिवसांत न सोडवल्यास पुढील वेळेस कचऱ्याच्या गाड्या नगरपरिषदेच्या कार्यालयात खाली करून अतिशय तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा "आम्ही राजगुरुनगरकर" वासीयांच्या वतीने देण्यात आला. 

 

टॅग्स :PuneपुणेKhedखेडGovernmentसरकारGarbage Disposal Issueकचरा प्रश्न