शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Omicron: पुण्यात कोरोनासह ओमायक्रॉनचाही उद्रेक; जिल्ह्यात रविवारी तब्बल ४६ रुग्णांची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2022 00:31 IST

राज्यात ५० ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण आढळून आले.

पुणे : रविवारी राज्यात कोरोना रुग्णसंख्येसह ओमायक्रॉनची लागण झालेल्या रुग्णसंख्येचा उद्रेक पहायला मिळाला. राज्यात ५० ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण आढळून आले. त्यापैकी ४६ रुग्ण पुणे जिल्ह्यात नोंदवले गेले आहेत. ५० पैकी ३८ भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेने (आयसर) तर १२ रुग्ण राष्ट्रीय कोशिका विज्ञान केंद्र (एनसीसीएस) यांनी रिपोर्ट केले आहेत. 

पुणे शहरात ३६, पिंपरी चिंचवडमध्ये ८ तर पुणे ग्रामीणमध्ये २ रुग्णांची नोंद झाली आहे. आजवर राज्यात ५१० ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी पुणे शहरात ४९, पिंपरी चिंचवडमध्ये ३६ आणि पुणे ग्रामीणमध्ये २३ रुग्ण आढळून आले आहेत. ५१० पैकी यापैकी १९३ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत २२८४ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी १३४ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

गर्दी रोखण्यापासूनच प्रसाराचा वेग कमी करता येईल 

''जनुकीय चाचणीसाठी जास्त नमुने पुणे जिल्ह्यातून गेल्याने रविवारी पुण्यातील ओमायक्रॉनबाधितांची संख्या जास्त दिसत आहे. सामुदायिक सर्वेक्षणातून काही बाधित आढळून आले आहेत. सामूहिक संसर्गाबाबत आयसीएमआरकडून अधिकृत अभ्यास पुढे येऊ शकेल. गर्दी रोखण्यापासूनच प्रसाराचा वेग कमी करता येऊ शकतो. लॉकडाऊन न करता आर्थिक व्यवहार सुरू ठेवून गर्दी रोखण्यासाठी निर्बंध कडक करण्याच्या दृष्टीने शासन आणि प्रशासन पातळीवर नियोजन सुरू आहे असे राज्य आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले.''  

खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्याच्या पायाभूत सुविधा सज्ज

''शहरात कोरोनाबधित आणि ओमायक्रॉनबाधितांची संख्या वाढत असताना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर दिला जाणार आहे. सध्या एका बाधित व्यक्तिमागे ८/ते १२ जणांचे ट्रेसिंग केले जात आहे. पॉझिटिव्हीटी रेट अधिक वाढल्यास हे प्रमाण १० - २२ पर्यंत वाढवले जाणार आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्याच्या पायाभूत सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. सध्या बाणेरचे जम्बो रुग्णालय, नायडू रुग्णालय सुरू असून गरज भासल्यास दळवी रुग्णालय, लायगुडे रुग्णालय, खेडकर हॉस्पिटल तसेच इतर रुग्णालये तातडीने सुरू करता येऊ शकतात असे पुणे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी  डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.''  

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनPuneपुणेcorona virusकोरोना वायरस बातम्याdocterडॉक्टर