शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल चार लाख अर्जदारांपैकी दाेन लाख कांदा उत्पादक विम्यासाठी ठरले अपात्र

By नितीन चौधरी | Updated: December 12, 2024 16:16 IST

राज्यसरकारचे वाचले ७० काेटी; बीड जिल्ह्याचा अहवाल अद्याप अप्राप्त

पुणे : नैसर्गिक आपत्ती आल्यास नुकसान भरपाई पोटी तब्बल ५० ते ८० हजार रुपये मिळत असल्याने राज्यातील शेतकऱ्यांनी सुमारे चार लाख अर्जांद्वारे कांद्याचा विमा काढला होता. त्यापैकी तब्बल पावणे दोन लाख अर्ज कृषी विभागाच्या पडताळणीत अपात्र ठरले आहेत. यातून तब्बल ९६ हजार हेक्टरवरील कांदा पिकाचा विमा बनावट असल्याचे आढळले आहे.बनावट अर्ज अपात्र ठरविल्याने राज्य सरकारचे तब्बल ७० कोटी रुपये वाचले आहेत. राज्यातील आठ जिल्ह्यांपैकी अद्याप बीड जिल्ह्याचा अहवाल प्राप्त झालेला नसल्याने बनावट अर्जांची संख्या दोन लाखांपर्यंत वाढू शकते, असा अंदाज कृषी विभागातील सूत्रांनी व्यक्त केला.कृषी विभागाच्या नजर अंदाजित क्षेत्रानुसार राज्यात यंदा आठ जिल्ह्यांमध्ये ७५ हजार ७९३ हेक्टरवर कांदा पिकाची लागवड झाली होती. कृषी आयुक्तालयाने राज्यातील नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, संभाजीनगर व बीड या आठ जिल्ह्यांमध्ये बनावट पीक विमा उतरवल्याचा संशय आल्यानंतर १० पथकांनी तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पडताळणी केली. या आठ जिल्ह्यांमध्ये ४ लाख २ हजार ३९८ अर्जदारांनी २ लाख ६४ हजार २४८ हेक्टरवरील कांदा पिकाचा विमा काढला होता. त्यात सर्वाधिक १ लाख २३ हजार ९५३ अर्जधारकांनी ८५ हजार ६६५ हेक्टर विमा एकट्या सोलापूर जिल्ह्यात काढण्यात आला होता. तर नाशिक जिल्ह्यात ८१ हजार ६२३ अर्जदारांनी ४८ हजार ३९४ हेक्टरवरील कांदा पीक विमा काढला होता.जवळपास ८४ हजार जणांच्या शेतातच नाही कांदापीककृषी विभागाने केलेल्या पडताळणीत तब्बल १ लाख ७४ हजार ९७२ अर्ज अपात्र ठरले असून या अर्जदारांनी ९५ हजार ७६५ हेक्टरवरील कांदा पिकाचा बनावट विमा काढल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी ८३ हजार ९११ अर्जांमध्ये कांदा पीकच नसल्याचे आढळले आहे. तर ६० हजार २५८ ठिकाणी लागवडीपेक्षा जादा क्षेत्राचा विमा काढला आहे. एकाच क्षेत्रावर दोनपेक्षा अधिक वेळा विमा घेतलेल्या अर्जांची संख्या ७४ असून तब्बल ३० हजार ६७४ शेतकऱ्यांनी या पडताळणीला कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पडताळणी केल्याने राज्य सरकारचे विमा हप्त्यापोटी देण्यात येणारे ७० कोटी रुपये वाचले आहेत.

बीड जिल्ह्याचा अहवाल आलेला नाही. त्यामुळे अपात्र अर्जांची संख्या एकूण अर्जांच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे.- विनयकुमार आवटे, संचालक, कृषी, पुणे 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडonionकांदाMarketबाजार