शालाबाह्य १४९0 मुले!
By Admin | Updated: July 6, 2015 04:48 IST2015-07-06T04:48:38+5:302015-07-06T04:48:38+5:30
जिल्ह्यात शनिवारी, ४ जुलै रोजी शालाबाह्य मुलांच्या केलेल्या सर्वेक्षणात १४९0 मुले आढळली. त्यात सर्वाधिक २१२ दौंड तालुक्यात व सर्वांत कमी १० वेल्हा तालुक्यात आढळली.

शालाबाह्य १४९0 मुले!
पुणे : जिल्ह्यात शनिवारी, ४ जुलै रोजी शालाबाह्य मुलांच्या केलेल्या सर्वेक्षणात १४९0 मुले आढळली. त्यात सर्वाधिक २१२ दौंड तालुक्यात व सर्वांत कमी १० वेल्हा तालुक्यात आढळली. १० हजार ५०० प्रगणकांनी प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन हे सर्वेक्षण केले, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कांतीलाल उमाप यांनी दिली.
शाळेत न जाणाारी बालके ज्यांनी शाळेत प्रवेश घेतलेला नाही किंवा प्रवेश घेऊन प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले नाही, असे ६ ते १४ वर्षे वयोगटातील बालक किंवा १ महिन्यापेक्षा अधिक काळ सातत्याने अनुपस्थित राहणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले. पल्स पोलिओच्या धर्तीवर ही मोहीम राबवून प्रत्येक सर्वेक्षित बालकाच्या बोटाला शाई लावण्यात आली. राज्यात सकाळी ७ ते सायंकाळी ७ असे सर्वत्र एकाच दिवशी राबविले गेले.
पुणे जिल्ह्यात ७ लाख ५५ हजार २५० एवढी कुटुंबसंख्या आहे. साधारण १०० घरांच्या सर्वेक्षणासाठी १ सर्वेक्षण अधिकारी नेमण्यात आला होते. १० हजार ५०० प्रगणक तथा सर्वेक्षण अधिकारी, ४९० झोनल अधिकारी व ३० नियंत्रक यांच्यामार्फत हे सर्वेक्षण केले. जिल्ह्यात १० विभाग करण्यात आले होते.
यात वय वर्षे ६ पूर्र्ण झालेली. पण अद्याप शाळेत न गेलेली अशी ६२० मुले तर मध्येच शाळा सोडलेली ८४२ मुले सापडली. वीटभट्टी कामगारांची, उसाचे शेतात काम करणारे मजूर, धरणाच्या परिसरात काम करणाऱ्या टोळ््या यांच्या मुलांचे प्रमाण जास्त आढळून आले.
या सर्व मुलांच्या पुढील शिक्षणासाठी ठोस उपाययोजना करण्यात आल्या असून केंद्रप्रमुखांवर केंद्रसमन्वयक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ते त्यांच्या कार्यक्षेत्रात आढळलेल्या मुलांना शाळेची गोडी लागण्यासाठी व नियमित शाळेत येण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच वयानुरूप प्रवेश दिला जाणार आहे. त्यांच्यासाठी अभ्यासक्रम वेगळा असणार असून त्यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. दररोज घरभेटीचा कार्यक्रम घेतला जाणार आहे. (प्रतिनिधी)
त्यांनीही केला मुलांना शाळेत पाठविण्याचा निर्धार
४या सर्वेक्षणात सर्वेक्षण अधिकारी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर असलेल्या भटक्या-विमुक्त कुटुंबांपर्यंत पोहोचली. याचे या कुटुंबांना नवल वाटले. त्यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शासन आपल्या मुलांना शाळेत प्रवेश देण्यासाठी घरापर्यंत आल्याने या कुटुंबांनीही आपल्या मुलांना शाळेत घालण्याचा निर्धार केल्याचे काही सर्वेक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले.
स्थलांतरित कुटुंबांच्या मुलांचा प्रश्न
या सर्वेक्षणात काही काम, व्यवसायानिमित्त काही दिवसांसाठीच स्थलांतरित असलेल्या कुटुंबांतील मुलेही आढळून आली आहेत. मात्र त्यांच्या शाळा प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाल्याचे उपशिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांनी सांगितले.
पुण्यात १,६८३
पुणे शहरात झोपडपटट्या, फुटपाथ, बस स्थानके, रेल्वे स्थानक, दगडखाणी, पूल आणि रस्त्यावर केलेल्या सर्व्हेक्षणात ६ लाख ६१ हजार ४१२ घरांचा सर्व्हेमध्ये १ हजार ६८३ मुले शाळेत आढळून आल्याची माहिती शिक्षण मंडळाचे प्रमुख बी. के. दहिफळे यांनी दिली.