आमची जुळून आलेली लय ही शेवटपर्यंत कायम राहिली : माऊली टाकळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:18 IST2021-02-05T05:18:08+5:302021-02-05T05:18:08+5:30
-माऊली टाकळकर, टाळवादक मंगरूळ गावातील मंदिरात वडील पुजारी होते. गुरुजींचे कन्नड अभंग कानी पडायचे. ते ऐकून मी शाळेत स्पर्धा ...

आमची जुळून आलेली लय ही शेवटपर्यंत कायम राहिली : माऊली टाकळकर
-माऊली टाकळकर, टाळवादक
मंगरूळ गावातील मंदिरात वडील पुजारी होते. गुरुजींचे कन्नड अभंग कानी पडायचे. ते ऐकून मी शाळेत स्पर्धा जिंकायचो. आमच्या मंदिरातील मैफलींसाठी गुरुजी यायचे. १९६७ मधली गोष्ट आहे. त्यांना तानपुऱ्याच्या साथीसाठी मुलगा हवा होता. ही जबाबदारी माझ्यावर आली. १९७१ मध्ये त्यांना पद्मश्री मिळाल्यानंतर मला तुमच्याकडे गाणे शिकायचे आहे, अशी इच्छा प्रदर्शित केली. त्यानंतर आठ वर्षांनी माझी तालीम सुरू झाली. गुरुजींचा सहवास आणि गायन संस्कार यामुळे जीवन घडले. गुरुजींसारखे कलाकार ही भारताची खरी संपत्ती आहे. त्यांच्या स्मृती जपल्या पाहिजे. महाराष्ट्रात कलाकारांची आठवण तरी काढली जाते. कर्नाटकात हे होत नाही. कर्नाटक सरकार स्मारक करणार होते; त्याचे पुढे काय झाले माहिती नाही.
-पं. उपेंद्र भट, पंडितजींचे शिष्य