शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

कोविडमध्ये आमचं १५ हजार कोटी रूपयांचे नुकसान; मॉल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2021 21:24 IST

शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाची मागणी

पुणे : पुणे शहरातील शॉपिंग मॉल्समध्ये बाह्य एजन्सीद्वारे कर्मचाऱ्यांसह अंदाजे ७६ हजार लोक काम करतात. कोविड निर्बंधांमुळे उद्योगांचे जवळपास १५ हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. किरकोळ स्टोअर्स आणि रेस्टॉरंट्समध्ये काम करणारे जवळपास ८० टक्के कर्मचारी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि त्यांच्या उपजीविकेवर सर्वात जास्त परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरातील सर्व मॉल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या (एससीएआई) वतीने करण्यात आली आहे.

पुण्यातील सर्व मॉलमध्ये काम करणारे किरकोळ विक्रेते आणि कर्मचारी हे अमानोरा मॉलच्या बाहेर जमले आणि कामाच्या अधिकाराच्या असमानतेचा निषेध केला. मॉलमधील सुमारे २०० कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजता आंदोलन केले. राज्य शासनाकडे त्यांनी काम करण्याचे समान अधिकार देण्याची मागणी यावेळी केली आहे.

शॉपिंग सेंटर इंडस्ट्री मॉल, रिटेल आणि मॅन्युफॅक्चरिंग रिटेलशी संबंधित असलेल्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे १.२ कोटी उपजीविकेला आधार देत आहे. या क्षेत्रात काम करणारे बहुतेक कर्मचारी इतर राज्यातून येत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे आणि कर्मचाऱ्यांमध्ये बेरोजगारी आणि जगण्याची प्रचंड भीती आहे.-----बरेच कर्मचारी कोणत्याही पर्यायी उत्पन्नाचे स्त्रोत नसताना बेरोजगार आहेत. पर्यायी उत्पन्नाचे स्त्रोत नसल्यास, हे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांकडे जगण्याचे कोणतेही साधन राहणार नाही. जर कोविड निर्बंध चालू राहिले तर बेरोजगारी वर्तमानापेक्षा लक्षणीय खराब होण्याचा धोका आहे. ते मॉल मालकांकडे बघत आहेत, दुर्दैवाने आम्ही असहाय आहोत. - सुरजीत सिंह राजपुरोहित, समिती सदस्य, शॉपिंग सेंटर्स असोसिएशन ऑफ इंडिया

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारcorona virusकोरोना वायरस बातम्या