ओतूरला आढळले ३६ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:10 IST2021-05-17T04:10:38+5:302021-05-17T04:10:38+5:30

ओतूर परिसरात शुक्रवारी १०, शनिवारी २०, रविवारी ६ असे ३६ नवीन रुग्ण सापडले आहेत. सर्व रुग्णांवर उपचार सुरू करण्यात ...

Otur was found to have 36 corona | ओतूरला आढळले ३६ कोरोनाबाधित

ओतूरला आढळले ३६ कोरोनाबाधित

ओतूर परिसरात शुक्रवारी १०, शनिवारी २०, रविवारी ६ असे ३६ नवीन रुग्ण सापडले आहेत. सर्व रुग्णांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. या नव्या बाधितांमुळे कोरोना रुग्णांची संख्या २ हजार ८७ झाली आहे. १ हजार ८२७ बरे झाले आहेत. १२७ जण विविध ठिकाणच्या कोविड सेंटर मध्ये तर ३८ जण घरीच उपचार घेत आहेत. ७९ जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. यादव शेखरे यांनी दिली. रविवारी डिंगोरे १, ओतूर ३, नेतवड माळवाडी, ठिकेकरवाडीत १ असे ६ नवीन रुग्ण सापडले आहेत.

शनिवारी डिंगोरे २, धोलवड २, ओतूर ४, नेतवड माळवाडी ८, उदापूर ४ असे २० नवीन रुग्ण सापडले.

शुक्रवारी डिंगोरे १, ओतूर ७, बल्लाळवाडी व आलमेत येथे १ असे १० रुग्ण सापडले आहेत.

Web Title: Otur was found to have 36 corona