ओतूर २० हजार ३७० कांदा पिशव्यांची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST2021-06-18T04:08:20+5:302021-06-18T04:08:20+5:30
ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे गुरुवारी २० हजार ३७० कांदा पिशव्यांची आवक ...

ओतूर २० हजार ३७० कांदा पिशव्यांची आवक
ओतूर : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार ओतूर येथे गुरुवारी २० हजार ३७० कांदा पिशव्यांची आवक झाली. नं. १ गोळा कांद्यास प्रतवारीनुसार १० किलोस २२० ते २५१ रुपये बाजारभाव मिळाला अशी माहिती जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ॲड. संजय काळे, उपसभापती दिलीप डुंबरे व ओतूर कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी दिली.
गुरुवारी प्रतवारीनुसार १० किलोचे भाव- कांदा नं. १ (गोळा)२२० ते २५१ रुपये.
कांदा नं. २ (सुपर कांदा) १७० ते २२० रुपये.
कांदा नं. ३ (गोल्टा) ११० ते १७० रुपये.
कांदा नं. ४ (गोलटी / बदला) ३० ते ११० रुपये.
गुरुवारी बाजारात बटाटा आवक झाली नाही. फक्त लसणाच्या ४ पिशव्यांची आवक होऊन प्रतवारीनुसार १० किलोस १५० ते ५११ रुपये बाजारभाव मिळाला असे ओतूर मार्केट कार्यालय प्रमुख दीपक मस्करे यांनी सांगितले.