...अन्यथा ऐन दिवाळीत व्यापार बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 05:02 IST2020-10-27T05:01:51+5:302020-10-27T05:02:25+5:30
एफडीएकडून चोर सोडून संन्याशाला शिक्षा देण्याचा प्रकार सुरू आहे. भेसळयुक्त तेलावर कारवाई झालीच पाहिजे; पण सध्या भेसळ करणाऱ्या बड्या कंपन्यांवर कारवाई न करता या कंपन्यांच्या पॅकिंग तेलाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.

...अन्यथा ऐन दिवाळीत व्यापार बंद
पुणे : एफएसएसएआय कायद्यातील अव्यवहार्य तरतुदीचा आधार घेऊन एफडीएच्या वतीने २२ ऑक्टोबर रोजी मार्केट यार्ड येथे कारवाई केली. एफडीएकडून चोर सोडून संन्याशाला शिक्षा देण्याचा प्रकार सुरू आहे. भेसळयुक्त तेलावर कारवाई झालीच पाहिजे; पण सध्या भेसळ करणाऱ्या बड्या कंपन्यांवर कारवाई न करता या कंपन्यांच्या पॅकिंग तेलाची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. खाद्यतेलावरील बेकायदा कारवाई न थांबविल्यास ऐन दिवाळीत तेलाचा व्यापार बंद ठेवण्यात येईल, असा स्पष्ट इशारा दि पूना मर्चण्ट चेंबरच्या वतीने दिला आहे. चेंबरचे अध्यक्ष ओस्तवाल यांनी सांगितले, एफएसएसएआय कायद्यातील आम्ही काय काळजी घेतली म्हणजे माल सील होणार नाही, याचा खुलासा केल्यास व्यवसाय करणे शक्य होईल.