.अन्यथा एसटी रोको आंदोलन!

By Admin | Updated: June 28, 2014 22:32 IST2014-06-28T22:32:43+5:302014-06-28T22:32:43+5:30

एसटी महामंडळाने पास द्यावेत; अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खेड तालुका काँग्रेस समितीने दिला आहे.

Otherwise ST Stop Movement! | .अन्यथा एसटी रोको आंदोलन!

.अन्यथा एसटी रोको आंदोलन!

>राजगुरुनगर : शाळा, महाविद्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राजगुरुनगर येथे शिक्षण घेण्यासाठी येणा:या विद्याथ्र्याना त्या-त्या शिक्षण संस्थेतच एसटी महामंडळाने पास द्यावेत; अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा खेड तालुका काँग्रेस समितीने दिला आहे.
एसटी स्थानकाच्या आवारात टवाळ मुलांकडून विद्यार्थीनींची छेडछाड होते. ही मुले त्यांच्याभोवती घिरटय़ा घालत राहतात. एसटी प्रशासनाचे यावर कुठलेही नियंत्रण नाही. 
पाससाठी मुलींना तेथून हलताही येत नाही. म्हणून त्या-त्या शाळा-महाविद्यालयांच्या ठिकाणी पास देण्याची सुविधा एसटीने द्यावी, अशी मागणी तालुका काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष विजय डोळस यांनी केली आहे. यापूर्वी अशी सुविधा देण्यात आली होती; ती बंद का करण्यात आली? असा सवालही त्यांनी केला आहे.
याबाबत एसटी महामंडळाचे प्रशासन जाणूनबुजून विद्याथ्र्याच्या अडचणींकडे आणि गैरसोयींकडे काणाडोळा करीत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. याबाबतचे  निवेदन डोळस यांनी राजगुरुनगरच्या एसटी आगारव्यवस्थापकांना दिले आहे. येत्या सात दिवसांत यावर कार्यवाही न झाल्यास खेड तालुका काँग्रेस एसटी रोको आंदोलन करील, असा इशारा त्यांनी दिला आहे. (वार्ताहर)
 
4खेड तालुक्यातील अनेक खेडय़ा-पाडय़ांतून, आदिवासी डोंगरी भागातून राजगुरुनगर येथे शाळा, महाविद्यालय, आयटीआय यांमध्ये शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. एसटी पास घेण्यासाठी विद्याथ्र्याची मोठी झुंबड उडते. तास बुडवून विद्यार्थी तासन् तास येथे उभे राहतात.

Web Title: Otherwise ST Stop Movement!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.