शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

परप्रांतीय मजुरांसाठी " इकडे आड तिकडे विहीर" ; बारामतीत अडकले ३ हजार ५०० मजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2020 14:00 IST

परप्रांतीय मजुरांना त्यांची राज्ये स्वीकारेनात

ठळक मुद्देबागायती क्षेत्र, बांधकाम व्यवसाय, एमआयडीसी यामुळे बारामती परिसरात मजुरांची संख्या मोठीकर्नाटक,पंजाब,उत्तरप्रदेश,बिहार,पश्चिम बंगाल या राज्यांकडून मजुरांविषयी विलंबाने प्रतिसाद

रविकिरण सासवडे- बारामती : महाराष्ट्र शासन कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी परवानगी देत आहे,  मात्र पंजाब,  कर्नाटक,  उत्तरप्रदेश ही राज्ये आपल्याच नागरिकांना स्वीकारण्यास पुढाकार घेताना दिसत नाहीत.  बारामती शहर व तालुक्यात असे सुमारे 3 हजार 500 परप्रांतीय मजूर अडकून पडले आहेत.  संचारबंदीच्या वाढत्या कालावधीमुळे आता या मजुरांचा धीर खचू लागला असून आम्ही चालत जाऊ पण आम्हाला आमच्या घरी जाऊद्या असा गहिवर हे मजूर घालू लागले आहेत.  कोरोनामुळे 18 मार्च रोजी महाराष्ट्र शासनाने तर 22 मार्च रोजी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केली. त्यामुळे बारामती तालुक्यात सुमारे 3 हजार 500 मजूर अडकून पडले आहेत. बागायती क्षेत्र, बांधकाम व्यवसाय, एमआयडीसी,  यामुळे बारामती परिसरात परप्रांतीय मजुरांची संख्या मोठी आहे. येथील तहसीलकार्यालयात या मजुरांनी  आपापल्या घरी जाण्यासाठी ऑनलाईन अर्ज देखील केले आहेत.ज्या मजुरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र आणि जाण्यासाठी वाहनाची सोय झाली आहे अशा मजुरांना त्यांच्या घरी जाण्यास परवानगी दिली जात आहे. मात्र हे मजूर ज्या राज्यातील आहेत त्या ठिकाणच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील परवानगी देणे गरजेचे आहे. कर्नाटक, पंजाब,  उत्तरप्रदेश,  बिहार,  पश्चिम बंगाल या राज्यांकडून अपेक्षित प्रतिसाद तातडीने मिळत नाही.त्यामुळे हे मजूर राज्याच्या सीमेवर अडकून पडतात. जोपर्यंत संबंधीत राज्याचे स्थानिक प्रशासन या मजुरांना स्वीकारण्याची तयारी दर्शवत नाही.तोपर्यंत या मजुरांना जाण्याची परवानगी देता येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत संबंधित राज्यातील स्थानिक प्रशासनाकाडे या मजुरांची यादी पाठवली आहे. त्यांची परवानगी मिळाली की या मजुरांना त्यांच्या घरी जाता येईल, अशी माहिती तहसीलदार विजय पाटील यांनी दिली.  

तुमच्या पाया पडतो आम्हाला घरी जाऊ द्या...गुणवडी (ता.बारामती) येथील अमित कुंभार यांच्या वीटभाट्टीवर सिंधगी (जि. विजापूर,  कर्नाटक)  येथील 17 मजूर अडकून पडले आहेत. यामध्ये 8 महिला,  तीन लहान मुले व 6 पुरुष आहेत. कुंभार यांनी मागील दीड महिना या मजुरांचा सांभाळ केला आहे. आताही या मजुरांना जीवनावश्यक वस्तू ते पुरवत आहेत. मात्र कोणाची लहान मुले गावी आहेत,  तर कोणाचे वृद्ध आई-वडील,  तसेच नुकतेच लग्न झालेली नववधु माहेरपणासठी आली ती इकडेच राहिली. तर एक तीन वषार्चा चिमुकला आईपासून दूर आला. या सर्वांची सोय होत असली तरी त्यांची येथे राहण्याची मानसिकता राहिली नाही. काही करा, तुमच्या पाया पडतो,  पण आम्हाला आमच्या घरी आमच्या माणसात जाऊ द्या.डोळ्यात पाणी आणून हे मजूर विनंती करताना दिसत आहेत. संचारबंदी किती दिवस राहील. आपली जिवाभावाची माणसं भेटतील का नाही या शंकानी या मजुरांच्या संयमाचा बांध आता सुटला आहे. आम्ही चालत जाऊ पण आम्हाला आता अडवू नका,  असा टाहो हे मजूर फोडत आहेत. 

बारामतीमध्ये अडकलेले परप्रांतीय मजूर...कर्नाटक -   201बिहार    -   300  छत्तीसगड - 345झारखंड -   114 पश्चिम बंगाल- 153 आंध्रप्रदेश -   41गुजरात -      1 महाराष्ट्र (इतर जिल्ह्यातील ) - 910

टॅग्स :BaramatiबारामतीMIDCएमआयडीसीcorona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीLabourकामगारKarnatakकर्नाटकBiharबिहारPunjabपंजाब