शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

‘जेट एअरवेज ’ची जागा घेणार दुसऱ्या कंपन्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2019 21:10 IST

पुणे विमानतळावरूनही जेट एअरवेजची दररोज १८ विमाने उड्डाण करत होती. पण फेब्रुवारी महिन्यापासून टप्प्याटप्याने एक-एक उड्डाण रद्द करण्यात येत होते.

ठळक मुद्देदोन दिवसांपुर्वी  कंपनीकडून अधिकृतपणे विमानसेवा बंद करणार असल्याचे जाहीर संबंधित वेळांमध्ये इतर विमान कंपन्यांनी सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिल्यास मान्यता

पुणे : जेट एअरवेजची विमानसेवा जमिनीवर आल्याने पुणेविमानतळावरून या कंपनीला दिलेल्या वेळा लवकरच दुसऱ्या विमान कंपन्यांना दिल्या जाणार आहेत. मात्र, त्यासाठी प्रवाशांना एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.जेट एअरवेज अडचणीत सापडल्यामुळे मागील काही महिन्यांपासून देशभरातील विमान उड्डाणे रद्द केली जात होती.

पुणे विमानतळावरूनही जेट एअरवेजची दररोज १८ विमाने उड्डाण करत होती. पण फेब्रुवारी महिन्यापासून टप्प्याटप्याने एक-एक उड्डाण रद्द करण्यात येत होते. एप्रिलपर्यंत देशांतर्गत बहुतेक ठिकाणांची सेवा बंद करण्यात आली होती. दोन दिवसांपुर्वी  कंपनीकडून अधिकृतपणे विमानसेवा बंद करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे विमानतळ प्रशासनाने या कंपनीसाठी निश्चित करून दिलेल्या वेळा इतर कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, तोपर्यंत या वेळांमध्ये उड्डाणे होत नव्हती. विमानतळ प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित वेळांमध्ये इतर विमान कंपन्यांनी सेवा सुरू करण्यासाठी प्रस्ताव दिल्यास त्यांना त्याची मान्यता देण्यात येईल. जेट एअरवेजला या वेळांमध्ये सेवा देण्याबाबत अंतिम मुदत देण्यात आली होती. पण त्यांनी ही सेवा सुरू केली नाही. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे एकुण १८ वेळा या कंपन्यांना दिल्या जातील. यामध्ये दोन उ्डडाणे आंतरराष्ट्रीय होती. पुणे विमानतळावरून दररोज १६० विमानांचे उ्डाण होत होते. जेट एअरवेज बंद झाल्याने हा आकडा १४२ वर आला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस पुन्हा नवीन विमाने सुरू होतील. -----------------प्रवाशांना परताव्याची प्रतिक्षाजेट एअरवेजच्या विमानांचे या महिनाभरात आरक्षित केलेल्या तिकिटांचे पैसे परत मिळविण्यासाठी प्रवाशांना वाट पाहावी लागणार आहे. विमान तिकीटांचे बुकींग करणाऱ्या एजंटांकडून याबाबत हात वर करण्यात आले आहेत. विमान कंपनीकडून तिकीटाचे पैसे परत मिळाल्यानंतर प्रवाशांना हे पैसे देणे शक्य होणार असल्याचे एजंंटांचे म्हणणे आहे. बहुतेक प्रवाशांना आतंरराष्ट्रीय विमानांचे तिकीट आरक्षित केले होते. बहुतेक प्रवासी आता एजंटमार्फत किंवा विविध कंपन्यांच्या ऑनलाईन सुविधेमार्फत तिकीटाचे आरक्षण करतात.

जेट एअरवेजची या शहरांमध्ये होती सेवा         पुणे विमानतळावरून दिल्ली, मुंबई, जयपुर, इंदौर, कोलकाता, बंगलुरू, चेन्नई, अहमदाबाद, हैद्राबाद, लखनऊ यांसह अन्य काही शहरांमध्ये विमानसेवा सुरू होती. तसेच सिंगापुर व अबुधाबी याठिकाणी आंतरराष्ट्रीय सेवाही दिली जात होती. या कंपनीच्या वेळांमध्ये या शहरांसाठी इतर कंपन्यांनी प्रस्ताव दिल्यानंतर नवीन सेवा सुरू केल्या जाणार आहेत. 

टॅग्स :Puneपुणेairplaneविमान