शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

'एमपीएससी'त अनाथांची जागा खुल्या गटाला, मंत्रालयासमोर उपोषण करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 12:10 IST

भाजप सरकार राज्यात सत्तेत असताना त्यांनी अनाथांना स्पर्धा परीक्षेत समांतर एक टक्का आरक्षण देण्यात आले होते...

ठळक मुद्देअनाथ उमेदवारांना डावलले, मुलाखतीला बोलावेलच नाही..

अनाथ उमेदवारांना डावलले; मुलाखतीला बोलावलेच नाही पुणे : राज्यात भाजपचे सरकार असताना अनाथांना स्पर्धा परीक्षेत समांतर १ टक्का आरक्षण देण्यात आले. परंतु, त्याची अंमलबजावणी मात्र अद्याप होताना दिसून येत नाही. नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर झाला. त्यात अनाथांना मुलाखतीला न बोलावताच त्यांची एक जागा खुल्या गटातील उमेदवाराला दिली आहे. त्यामुळे अनाथ अधिकारी होण्यापासून वंचित राहिले आहेत, असा आरोप स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी आणि अनाथांसाठी लढणारी अमृता करवंदे हिने केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षेत अनाथ उमेदवार उत्तीर्ण होऊनही त्यांना अधिकारी होता आले नाही. कारण अनाथ असल्याने त्यांच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र नव्हते. या प्रश्नावर अमृता करवंदे हिने सतत लढा दिला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाथांसाठी समांतर १ टक्का आरक्षण जाहीर केले. त्यामुळे अनाथांना दिलासा मिळाला होता. पण दोन वर्षे झाली तरी मुख्य परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊनही अनाथ उमेदवारांना मुलाखतीला बोलावले जात नाही. त्यामुळे त्यांची जागा रिक्त दाखवून ती जागा खुल्या गटातील उमेदवाराला दिली जात आहे. याविषयी अमृता करवंदे म्हणाली,‘‘आम्ही सतत आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी म्हणून प्रयत्न करतोय. मंत्रालयात फेऱ्या मारतोय. परंतु, एमपीएससीकडून दखल घेतली जात नाही. मंत्रालयात मार्च २०२० मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली होती. तेव्हा त्यांनी आयोगाला योग्य कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानंतरही या वेळी निकालात अनाथांना ठेंगाच दिला आहे.’’ =======================...मंत्रालयासमोर उपोषणच करणार ! राज्यात अनाथ प्रमाणपत्र घेतलेले १०४ जण आहेत. त्यातील फक्त १० ते १५ जण पदवीधर आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात. आम्ही या वेळी परीक्षा दिली. मुख्य परीक्षेपर्यंत माझ्यासह काही उमेदवार गेले. पण मुलाखतीसाठी आम्हाला बोलावलेच नाही. हा आमच्यावर अन्याय केला जात आहे. सतत मंत्रालयात जाणे परवडत नाही. आता तिथे जाऊन उपोषण करण्याशिवाय पर्यायच राहिला नाही. - अमृता करवंदे, अनाथांसाठी काम करणारी आणि स्पर्धा परीक्षेची विद्यार्थिनी =====================

टॅग्स :PuneपुणेMPSC examएमपीएससी परीक्षाState Governmentराज्य सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा