जेजुरी, सासवडमध्ये आज ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रमाचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 03:20 IST2017-11-27T03:20:05+5:302017-11-27T03:20:30+5:30
लोकमत सखी मंचच्या सदस्यांसाठी ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जेजुरी, सासवड, बारामती, उरुळी कांचन येथील सखींना हास्यकल्लोळ कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे.

जेजुरी, सासवडमध्ये आज ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : लोकमत सखी मंचच्या सदस्यांसाठी ‘हास्यकल्लोळ’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जेजुरी, सासवड, बारामती, उरुळी कांचन येथील सखींना हास्यकल्लोळ कार्यक्रमाचा आनंद घेता येणार आहे. सखी मंच सभासदांसाठी खास दर्जेदार कार्यक्रम जागतिक पातळीवर गौरवण्यात आलेला देश-परदेशात गाजलेल्या एकमेव अद्वितीय हास्यसम्राट प्रा. दीपक देशपांडे कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत. महाराष्ट्राला एकपात्री प्रयोगाची फार मोठी परंपरा आहे.
मराठी भाषा ही अत्यंत लवचिक आहे. कर्नाटक, आंध्र, गोवा या राज्यातील भाषांचा परिणाम मराठीवर झालेला आहे. सोलापूर हे महाराष्ट्रातलं भाषेच्या दृष्टीकोनातून वैशिष्ट्यपूर्ण गाव आहे. कानडी, तेलुगू, हिंदी या तीन भाषांच्या प्रभावामुळे सोलापुरी मराठी हा एक वेगळी बोलीभाषेचा प्रकार तयार झाला आहे.
या भाषेची वैशिष्ट्ये ‘हास्यकल्लोळ’मध्ये आहेत. सोलापूर, पुणे, कोल्हापूर, मराठवाडा या भागातील बोलीभाषांचा मनोरंजक आढावा प्रा. देशपांडे यांनी घेतला आहे.
प्राचीन मराठी सिनेमापासून आजच्या मराठी सिनेमाचा बदललेला आवाज, हिंदी, इंग्रजी, रशियन, कानडी सिनेमाच्या आवाजांची वैशिष्ट्ये गल्लीतल्या गायकांपासून ते पं. कुमार गंधर्वांपर्यंत, गल्लीतल्या पुढाºयांपासून ते शरद पवार व अटलजींच्या भाषणापर्यंतची वैशिष्ट्ये, बाबामहाराज सातारकरांच्या प्रवचनाची झलक या हास्यकल्लोळमध्ये नेमकेपणाने सादर होते. कार्यक्रमाच्या ठिकाणी सखी मंच सदस्यांसाठी २0१७ च्या ओळखपत्रावर प्रवेश दिला जाईल. प्रवेश फक्त सखी मंचच्या सभासदांसाठीच आहे. प्रथम येणाºयास प्राधान्य या तत्वावर आसन व्यवस्था आहे.
जेजुरी : दि. २७ नोव्हेंबर २0१७ वेळ : दुपारी १२ वाजता स्थळ : सेवेकरी मंगल कार्यालय, जिजामाता हायस्कुल समोर, जेजुरी. संपर्क : बाळासाहेब काळे : ९९२२00७९९४
सासवड : दि. २७ नोव्हेंबर २0१७ वेळ : दुपारी ४ वाजता स्थळ : जयदीप मंगल कार्यालय, सोनोरी रोड, सासवड. संपर्क : बाळासाहेब कुलकर्णी : ८६00१३९६१३
बारामती : दि. २८ नोव्हेंबर २0१७ : वेळ : दुपारी ४ वाजता स्थळ : वसंतराव पवार नाट्यगृह बारामती. संपर्क : प्रशांत ननावरे : ९८५0१९२२४४
उरूळी कांचन : दि. ३0 नोव्हेंबर २0१७ : वेळ : दुपारी ४ वाजता स्थळ : शिवकृपा मंगल कार्यालय (मागील प्रवेश द्वाराने) पुणे-सोलापूर उरूळी कांचन. संपर्क : सुनील जगताप : ९६५७४५२३00