बैलगाडा शर्यतीचे आयोजन; बारा जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST2021-02-05T05:03:32+5:302021-02-05T05:03:32+5:30
याप्रकरणी पोलीस अंमलदार हर्षल सुनील शिरवले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयोजकासह बैलगाडा चालक-मालक व जागामालक असलेल्या अशोक बबनराव राक्षे (रा. ...

बैलगाडा शर्यतीचे आयोजन; बारा जणांवर गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलीस अंमलदार हर्षल सुनील शिरवले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आयोजकासह बैलगाडा चालक-मालक व जागामालक असलेल्या अशोक बबनराव राक्षे (रा. राक्षेवाडी), भाऊ निवृत्ती वाटेकर, सूर्यकांत एकनाथ वाटेकर, सूर्यकांत दत्तात्रय वाटेकर, यशवंत नामदेव वाटेकर, रंगनाथ नामदेव वाटेकर, सुदाम हनुमंत वाटेकर, नारायण गुलाब वाटेकर, अनिल दत्तात्रय वाटेकर, संदीप सखाराम वाटेकर, दिलीप विष्णू वाटेकर,मुरलीधर राजाराम वाटेकर (सर्व, रा. वाटेकरवाडी, काळूस) आदी बारा जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
चाकण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : काळूस (ता. खेड) येथील वाटेकरवाडीच्या भैरवनाथ मंदिराजवळ काही जणांनी बुधवारी (दि. ३) सकाळी ६.३० च्या सुमारास बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शर्यत रोखली. बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली असल्याने तसेच कोविड - १९ च्या शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी वरील सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा अधिक सुरू आहे.