शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

आंबेगाव तालुक्यात बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 6:27 PM

बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल नऊ जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

ठळक मुद्दे नऊ जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा 

अवसरी : अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याबद्दल नऊ जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाची बंदी असतानादेखील बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याचे मंचरपोलिसांनी सांगितले. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथे शनिवारी( दि. २२) सकाळी साडेदहा वाजता बैलगाडा घाटात विनापरवाना काही लोक बैलगाड्या पळवत असल्याचे मंचर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार एस. डी. बरकडे, पोलीस कर्मचारी एस. बी. गिलबिले, एस. एस. गायकवाड, एस. आर. वाफगावकर, व्ही. बी. वाघ यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून तेथील लोकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बैलगाडा शर्यतीस बंदी असून बैलगाडा शर्यत घेतल्यास कायदेशीर कारवाई होईल. असे वारंवार आदेश देऊनसुद्धा तेथील लोकांनी बैलगाडा शर्यत घेणे थांबवले नाही. लोकांनी बैलगाडा शर्यत चालू ठेवली. तेथे मोठा जनसमुदाय उपस्थित असल्याने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणारे  किशोर कोंडीभाऊ हिंगे, संजय जयसिंग हिंगे, विनोद रमेश हिंगे, विजय विष्णू हिंगे, सुमित अनंता हिंगे, नितीन खंडेराव हिंगे, धनेश सुधाकर हिंगे, पवन लक्ष्मण हिले, राहुल आनंदराव हिंगे यांच्यावर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  या घटनेचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुनील शिंदे करत आहेत. बैलांना चढणीच्या रस्त्याने घाटात चढाला त्यांच्या क्षमतेपेक्षा व ताकतीपेक्षा जास्त पळवल्याने त्यांना यातना होईल अशाप्रकारे क्रूरतेने व निर्दयपणे वागवून त्यांना बैलगाड्याला जुंपून बैलगाड्यासह पळविणे तसेच शर्यतीचे आयोजन करुन बैलांचा छळ केला. म्हणून मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुदर्शन माताडे यांनी संबंधितांच्या विरोधात फिर्याद दिली.

टॅग्स :ambegaonआंबेगावMancharमंचरPoliceपोलिस