शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

अनाथ, वंचितांच्या दारी आनंदमय दिवाळी, शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 3:22 AM

वंचित, अनाथ आणि विशेष मुलांना आर्थिक गरज असतेच, पण त्याहीपेक्षा हृदयाची गरज जास्त असते. आपुलकी, प्रेम आणि कौतुकाची थाप यासाठी ही मुले भुकेलेली असतात. त्यामुळे त्या मुलांचा उद्या आपल्याला जपायचा असेल...

पुणे : वंचित, अनाथ आणि विशेष मुलांना आर्थिक गरज असतेच, पण त्याहीपेक्षा हृदयाची गरज जास्त असते. आपुलकी, प्रेम आणि कौतुकाची थाप यासाठी ही मुले भुकेलेली असतात. त्यामुळे त्या मुलांचा उद्या आपल्याला जपायचा असेल, तर त्यांना भरघोस प्रेम द्यायला हवे. एखाद्या तरी मुलाला, तू मला आवडतोस असे म्हणून आपुलकीच्या भावनेने जवळ घ्यावे तरच ईश्वराने निर्माण केलेल्या या बालकांना आपलेपणा देण्याचे सत्कार्य आपल्या हातून घडेल, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणू गावस्कर यांनी सांगितले.शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे दिवाळीचा आनंद समाजातील प्रत्येक घटकाला घेता यावा, याकरिता श्रीवत्स संस्थेत आपुलकीची दिवाळी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी महापौर मुक्ता टिळक, पोलीस उपायुक्त डॉ. बसवराज तेली, उद्योजक रसिक नहार, सोफोशचे अरविंद हेर्लेकर, अनिल नवले, निवेदिता गोगटे, निर्मला लाहोटी, आदिती देवधर, शाम मेहेंदळे, पराग ठाकूर आदी उपस्थित होते. श्रीवत्स, एकलव्य न्यास आणि प्राथमिक शिक्षण मंडळ, रास्ता पेठ यांना आवश्यक असणारी औषधे, धान्य, जीवनावश्यक वस्तू, शालेय साहित्य आणि रोख रक्कम अशी एकूण ५ लाख रुपयांची दिवाळी भेट देण्यात आली. उपक्रमाचे यंदा २०वे वर्ष आहे.मुक्ता टिळक म्हणाल्या, ज्यांचे या जगात कोणीही नाही अशांना अनाथ आश्रमात ठेवणे हे ठीक असले, तरीही अपत्य म्हणून मुली झाल्या म्हणून त्यांना आश्रमात सोडून जाणे, ही परिस्थिती आजच्या २१व्या शतकात काळजी करण्यासारखी आहे. केवळ स्त्रीभ्रूणहत्येवर बोलणे पुरेसे नाही, तर त्यावर काम करुन समाजातील अशा विचारांच्या लोकांचे मतपरिवर्तन करणे आवश्यक आहे.दिवाळीनिमित्त या तिन्ही सामाजिक संस्थांना एलआयसी पुणे शहर, आफळे अ‍ॅकॅडमी, हिंदू महिला सभा, चिमण्या गणपती मंडळ, नवा विष्णू चौक नवरात्र उत्सव मंडळ, शनिपार गणेशोत्सव मंडळ, प्रभात मित्र मंडळ, इमर्सन कंपनी, युनिक आॅफसेट, कुंभोजकर मित्र मंडळ, हिंदू राष्ट्र तरुण मंडळ यांसह अनेक संस्थांनी मदत दिली. श्रीवत्समधील चिमुकल्यांनी नृत्य सादरीकरण केले. आर्या ठाकूर हिने सूत्रसंचालन केले. पराग ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. अवधूत काजरेकर यांनी आभार मानले. 

टॅग्स :diwaliदिवाळीPuneपुणे