शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देशात जैव शेतीचे प्राबल्य वाढेल : बुधाजीराव मुळीक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 11:23 IST

आगामी वर्षामधे शेतीमध्ये आमूलाग्र बदल होतील. ते देखील ग्राहकामुळेच. ग्राहकच सेंद्रीय मालाला अधिक पसंती देतील.

ठळक मुद्देशेतीत तंत्रज्ञानाच्या वापरात होणार वाढ स्वातंत्र्यानंतर शेती आणि पुरक व्यवसायांनी अनेक स्थित्यंतरे सेंद्रीय पदार्थांच्या मागणीत येत्या काळात वाढ होणार

पुणे : शेतकरी आत्महत्या...शेतीमालाला मिळणारा कवडीमोल भाव...जल प्रदुषण आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे विषयुक्त झालेला शेतमाल...असे सध्याच्या शेतीचे वर्णन करता येईल. मात्र, आगामी वर्षामधे शेतीमध्ये आमूलाग्र बदल होतील. ते देखील ग्राहकामुळेच. ग्राहकच सेंद्रीय मालाला अधिक पसंती देतील. त्यामुळे भविष्यात जैव शेतीला मागणी वाढणार असून, अनेक बड्या कंपन्यादेखील यात रस घेतील, असे भाकीत प्रसिद्ध कृषी तज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांनी व्यक्त केले. दहा वर्षांनतर देशातील शेती कशी असेल, याचा अंदाज डॉ. मुळीक यांनी लोकमतकडे व्यक्त केला. स्वातंत्र्यानंतर शेती आणि पुरक व्यवसायांनी अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. त्यात १९५०च्या दशकातील धान्य उत्पादनाच्या समस्ये पासून, नंतरच्या प्रत्येक दशकात शेतीत बदल होत गेले. यांत्रिकीकरण, हरितक्रांती, धवलक्रांती, मत्स्य शेतीची नील क्रांती, फळे आणि फुलांची रेनबो क्रांती आणि जैव तंत्रज्ञानाची ओळख, हे टप्पे आहेत. सध्या शेतकरी शेतमालाला भाव मिळत नसल्याने चिंताक्रांत आहेत. जलप्रदूषण आणि रासायनिक खतांच्या अपरिमित वापरामुळे शेतमाल विषयुक्त होत आहे. त्यामुळे आरोग्य समस्या उद्भवू लागल्या आहेत. ग्राहकच आता सेंद्रीय पदार्थांची मागणी करताना दिसत आहेत. येत्या काळात या मागणीत वाढच होत जाणार आहे. येणारा काळ हा जैविक शेतीचा असेल. या शेतीमधे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील वापर होईल. खते, बियाणे याची मागणी ऑनलाईन होईल. उलट, अनेक कंपन्या शेतकऱ्यांना बांधावरच हव्या त्या वस्तू देतील. अभियांत्रिकी, वैद्यक आणि माहिती तंत्रज्ञान यांच्या वाढीला एक मर्यादा आहे. शिवाय प्रत्येक व्यक्ती हा डॉक्टर असला काय अथवा कामगार असला काय त्याला रोजचा आहार हवाच आहे. अर्थातच तो सकस आहारालाच प्राधान्य देईल. बदलत्या काळामधे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे शेतीवरील मनुष्यबळ काहीसे कमी होईल. मात्र, इतर विभागांच्या तुलनेत ते काहीसे अधिक राहील. येत्या काळात शिक्षित तरुण देखील शेतीकडे वळतील. त्यात नवा बदल करु पाहतील. त्या जोडीला बाजार देखील आॅनलाईन झालेले असतील. शेतकऱ्यांना आपल्या मोबाईलवरच शेतीचे दर, मालाची उत्पादकता, देशी आणि आंतरराष्ट्रीय बाजारभाव याची माहिती मिळेल. शेतीमधे देखील माहिती आणि तंत्रज्ञान असेल. त्या आधारावर तयार होणाऱ्या नवीन क्षेत्रात अनेक कंपन्या गुंतवणूक करताना दिसतील. महत्त्वाचे म्हणजे शहरातील पाणी प्रक्रियाकडून नदीत सोडण्याला सरकार प्राधान्य देईल. थोडक्यात,शेतकºयांचे भविष्य उज्जवल असेल. 

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीFarmerशेतकरी