शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भिमाले, कांबळे आणि शिरोळे यांना पदांचे राजीनामे देण्याचे आदेश : माधुरी मिसाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 20:43 IST

कांबळे आणि शिरोळे हे आमदार म्हणून निवडून आल्याने पक्षाने हा निर्णय घेतला..

ठळक मुद्दे पुढील पद निवडी संदर्भांत मंगळवारी निर्णय

पुणे : महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीनंतर लवकरच अन्य पदासाठी देखील निवडणूक होणार असल्याची चर्चा होती. त्यानुसार गुरुवार (दि.२८) रोजी सत्ताधारी भाजपने सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्यासह स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे आणि पीएमपीएमपीचे संचालक सिध्दार्थ शिरोळे यांना त्यांच्या पदाचे राजीनामे देण्याचे आदेश दिले. कांबळे आणि शिरोळे हे आमदार म्हणून निवडून आल्याने पक्षाने हा निर्णय घेतला आहे.        महापालिकेतील महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणूका नुकत्याच पार पडल्या. त्यामुळे महापालिकेतील अन्य पदाधिकारी बदलणार का याबाबत उत्सुकता होती. त्यातच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे हे पुणे कॅन्टोमेन्ट मतदारसंघातून तर पीएमपीएमपीचे संचालक असलेले सिध्दार्थ शिरोळे हे शिवाजीनगर मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळे एका व्यक्तीकडे तीन पेक्षा अधिक पदे भाजप ठेवणार का असा प्रश्न होता. त्यानुसार आता राज्यातील सत्ता गमाविल्यानंतर भाजपने भिमाले, कांबळे आणि शिरोळे यांना त्यांच्याकडील पदांचे राजीनामे देण्याचे आदेश गुरूवारी दिले.      दरम्यान शिरोळे यांनी सायंकाळी शहर सरचिटणीस गणेश बिडकर यांच्याकडे त्यांच्या राजीनामा सुपुर्द केला. तर सभागृह नेते भिमाले हे शहराबाहेर असल्याने रात्री पुण्यात आल्यानंतर राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर स्थायी अध्यक्ष कांबळे यांनी याबाबत आपल्याला राजीनाम्याबाबत सुचना मिळाल्या नसल्याचे स्पष्ट केले.------------------------    विधानसभा निवडणुकीनंतर महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक घेऊन नविन सदस्यांची निवड करण्यात आली. आता अन्य पदासाठी देखील लवकरच निवडणूक घेण्यात येणार आहे. यामुळेच महापालिकेतील सभागृह नेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि पीएमपी संचालक यांना त्यांचा पदाच्या राजीनामे देण्याच्या सुचना देण्यात आले आहेत. हे राजीनामे घेऊन येत्या मंगळवारी त्यावर निर्णय घेतला जाईल.-  माधुरी मिसाळ, भाजप शहराध्यक्षा व आमदार

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाmadhuri misalमाधुरी मिसाळShrinath Bhimaleश्रीनाथ भिमालेBJPभाजपा