रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे याची स्थावर मालमत्ता जप्तीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:18 IST2021-02-05T05:18:23+5:302021-02-05T05:18:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रास्ता पेठेतील जागा खंडणी स्वरूपात मागितल्याच्या कारणावरून माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे यांच्यासह चार ...

Order for confiscation of real estate of Ravindra Laxman Barhate | रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे याची स्थावर मालमत्ता जप्तीचे आदेश

रवींद्र लक्ष्मण बऱ्हाटे याची स्थावर मालमत्ता जप्तीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : रास्ता पेठेतील जागा खंडणी स्वरूपात मागितल्याच्या कारणावरून माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे यांच्यासह चार जणांवर कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने फरारी घोषित केले आहे. तो अद्यापही फरारी असल्याने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी सीआरपीसी कलम 83 प्रमाणे त्याची स्थावर मालमत्ता जप्तीचे आदेश सोमवारी (दि.1) दिले आहेत.

रवींद्र बऱ्हाटे यांची मधुसुधा अपार्टमेंट, लुल्लानगर कोंढवा येथील एक फ्लॅट, सरगम सोसायटी तळजाई पठार धनकवडी मधला एक मोकळा प्लॉट आणि एका प्लॉटवरील बंगला आणि कात्रज भागातील भागीदारीमधील जमीन मिळकत अशी करोडो रूपये किंमतीची मालमत्ता जप्त करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. पोलिसांकडून इतर मालमत्तेचा शोध चालू असून, प्राप्त होणा-या इतर मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही देखील लवकरच केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

बऱ्हाटे यांच्याविरूद्ध बांधकाम व्यावसायिक सुधीर वसंत कर्नाटकी यांनी याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीनुसार कोथरुड पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आठ आरोपींविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

Web Title: Order for confiscation of real estate of Ravindra Laxman Barhate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.