शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
3
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
4
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
5
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
6
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
7
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
8
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
9
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
10
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
11
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
12
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
13
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
14
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
15
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
रशियाने दिलेला शब्द पाळला! चौथी S-400 प्रणाली भारतात दाखल; आता शत्रूचे विमान हवेतच भस्म होणार
19
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
20
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
Daily Top 2Weekly Top 5

पालखी सोहळ्यापूर्वी देहूतील कामे पूर्ण करण्याचे आदेश

By admin | Updated: July 1, 2015 23:47 IST

जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या ३३०व्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील विकासकामांची पाहणी बुधवारी विभागीय आयुक्त चोकलिंगम यांनी केली.

देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराजांच्या ३३०व्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील विकासकामांची पाहणी बुधवारी विभागीय आयुक्त चोकलिंगम यांनी केली. जी कामे तातडीने करता येतील, ती कामे पालखी सोहळ्यापूर्वी करून घेण्याचे आदेश दिले असून, उर्वरित कामे पालखी सोहळ्यानंतर सुरू करून त्या कामांना गती देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पालखी सोहळ्याचे प्रस्थान ८ जुलै रोजी होणार असल्याने पालखीची तयारीची पाहणी करण्याबरोबरच तीर्थक्षेत्र विकासकामांर्तगत सुरू असलेल्या कामांची विभागीय आयुक्तांनी पाहणी केली. शेतकऱ्यांची नुकसान भरपाई व आरक्षित शेतजमिनीचा मोबदला १५ जुलैपर्यंत किमान ५० टक्के लोकांना तरी वाटप करावेत, असे संबंधितांना त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी सौरभ राव उपस्थित होते.श्री संत तुकाराममहाराजांच्या मंदिरात दर्शन घेऊन संस्थानच्या अडचणी समजावून घेत मंदिर परिसरातील संत नारायणमहाराज समाधी मंदिराकडे व इंद्रायणी नदीकडे जाणाऱ्या घाटरस्त्यावर दगडी फरशी बसविण्याचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करावे, पालखी मार्गावरील पहिल्या मुक्कामाच्या इनामदार वाड्यापुढील काम तातडीने उरकण्यात यावे, या ठिकाणचा व पंढरपूर येथील शेवटच्या मुक्कामाची जागा असलेला संत तुकाराममहाराज मठदेखील पालखी तळ म्हणून विकास करण्यात यावा, अशी मागणी संस्थानच्या वतीने करण्यात आली. (वार्ताहर)