शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पुण्यात हेल्मेटसक्तीला विरोध: वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2018 08:25 IST

पुणे पोलिसांनी येत्या १ जानेवारी २०१९पासून अमलात आणल्या जाणाऱ्या हेल्मेट सक्तीच्या प्रभावी अंमलबजावणीची घोषणा केल्यावर पुण्यातील स्वयंसेवी संस्थांनी त्याला विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे.

पुणे : पुणेपोलिसांनी येत्या १ जानेवारी २०१९पासून अमलात आणल्या जाणाऱ्या हेल्मेट सक्तीच्या प्रभावी अंमलबजावणीची घोषणा केल्यावर पुण्यातील स्वयंसेवी संस्थांनी त्याला विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे. याबाबत हेल्मेट विरोधी कृती समिती पुढे सरसावली असून येत्या मंगळवारी या विषयावर बैठक होणार असल्याचे समजते.दरम्यान पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांना सत्य परिस्थिती सांगून, निवेदन देऊन हेल्मेटसक्ती मागे घेण्याची विनंती केली जाणार आहे मात्र तरीही सक्ती केली जाणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा समितीतर्फे अंकुश काकडे यांनी दिला आहे.  

         पुढे ते म्हणाले की, नवीन पोलीस आयुक्त आले की हेल्मेट सक्ती लागू केली जाते. यापूर्वी चार ते पाचवेळा हा प्रयोग झाला आहे. मात्र दरवेळी पुणेकरांनी कडाडून विरोध केल्यावर सक्ती मागे घेण्यात आली आहे. शहरात असणारी वाहन संख्या, अरुंद रस्ते आणि वाहतुकीचा बोजवारा यांचा विचार केला तर ताशी ३० किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने दुचाकी चालवणे अशक्य आहे. अशावेळी हेल्मेटची तितकीशी गरज नाही. याच विषयावर सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनीही मत मांडले आहे. ते म्हणाले की, शहरात असणाऱ्या वाहनांची संख्या बघता तेवढे आयएसआय मान्य असलेले हेल्मेट उपलब्ध  होणे अशक्य आहे. त्यामुळे निकृष्ट प्रतीचे आणि जीव वाचवण्यासाठी निरुपयोगी तसेच फक्त पोलिसांना दाखवण्यापुरत्या हेल्मेटचा वापर वाढणार आहे. दुसरीकडे दारू पिऊन गाडी चालवणं, नो एंट्रीतून गाडी चालवणं अशा अ दर्जाच्या नियमबाह्य वर्तनावर कडक कारवाई न करता पोलीस हेल्मेटच्या मागे लागताना दिसत आहेत.

हेल्मेटला विरोध नाहीच !

एखादा दुचाकीस्वार स्वखुशीने हेल्मेट वापरत असेल तर त्याला आमची हरकत नाही. उलट राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट अतिशय गरजेचे आहे. मात्र पुणे शहरात हेल्मेटसक्ती करणे चुकीचे आहे असे स्पष्ट मत या दोघांनी व्यक्त केले. 

शंभर टक्के पोलिसांनी हेल्मेट वापरावे 

हेल्मेट वापरणे फक्त नागरिकांची जबाबदारी नसून समान कायदा असणाऱ्या पोलिसांचीही जबाबदारी आहे.त्यामुळे फक्त पुढे बसणाऱ्या नाही तर कायद्यात सांगितल्याप्रमाणे मागे बसलेल्या प्रत्येक पोलिसानेही तीन महिने हेल्मेट वापरून दाखवावे आणि मग नागरिकांना प्रबोधन करावे असे आव्हान वेलणकर यांनी दिले. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस