शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

भाडेआकारणीला विरोध; पथारी व्यावसायिकांचा पुणे महापालिकेवर धडक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 1:27 PM

पथारी व्यावसायीक कष्टकरी पंचायतीच्यावतीने पुणे महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शहरामधून हजारो कष्टकरी सहभागी झाले होते.

ठळक मुद्देपथारी व्यावसायिकांना दिवसाला, २००, १५०, १०० आणि ५० रुपये अशी भाडे आकारणीमोर्चादरम्यान पथारी व्यावसायीकांनी जोरदार केली घोषणाबाजी

पुणे : महापालिकेने शहरातील पथारी व्यावसायिकांची अ, ब, क आणि ड अशी वर्गवारी करुन त्यांना नुकतेच परवाने दिले आहेत. या पथारी व्यावसायिकांना दिवसाला, २००, १५०, १०० आणि ५० रुपये अशी भाडे आकारणी केली जात आहे. पालिकेचा हा निर्णय म्हणजे कष्टकऱ्यांची पिळवणूक असून हा जिझीया कर असल्याची टीका ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांनी केली आहे. हे भुईभाडे तत्काळ रद्द करावी, अशी मागणी हजारो पथारी व्यावसायिकांनी केली. पथारी व्यावसायीक कष्टकरी पंचायतीच्यावतीने पुणे महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये शहरामधून हजारो कष्टकरी सहभागी झाले होते. स्टॉलधारक, फिरते विक्रेते, हातगाडी चालकांनी या मोर्चामध्ये उत्स्फुर्त सहभाग नोंदवत प्रशासनाच्या कारभाराचा निषेध व्यक्त केला. स्वारगेट येथील केशवराज जेधे चौकामधून सकाळी अकराच्या सुमारास मोर्चाला सुरुवात करण्यात आली. मोर्चाचे नेतृत्व स्वत: डॉ. बाबा आढाव आणि पंचायतीचे सचिव बाळासाहेब मोरे यांनी केले. बाजीराव रस्त्याने हा मोर्चा पुणे महापालिकेवर पोचला. मोर्चादरम्यान पथारी व्यावसायीकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पालिकेचे अधिकारी कसे पैसे उकळतात, भ्रष्टाचार कसा केला जातो, कष्टकऱ्यांना नाडण्याचे काम हे अधिकारी करतात अशा स्वरुपाच्या घोषणा देण्यात येत होत्या. हातामध्ये लाल झेंडे घेऊन मोठ्या प्रमाणावर महिलाही सहभागी झाल्या होत्या. पथारी व्यावसायीकांचे दिवसाचे उत्पन्न अत्यल्प आहे. या उत्पन्नामधून दिवसाला होणारी भाड्याची आकारणी कष्टकऱ्यांना न पेलवणारी आहे. शहरामध्ये एकीकडे धनदांडग्यांची आणि बड्या व्यावसायीकांची अतिक्रमणे वाढत चाललेली असताना त्यावर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नाही. मात्र, दुसरीकडे गरीब कष्टकऱ्यांच्या कष्टाची भाकर हिरावून घेण्याचा प्रयत्न महापालिकेचे अधिकारी करीत असल्याचा आरोप बाळासाहेब मोरे यांनी केला. 

टॅग्स :Baba Adhavबाबा आढावPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे