शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आई अन् बहिणीचे प्रेम विरोधकांना कळत नाही, देवेंद्र फडणवीस यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 06:06 IST

Devendra Fadnavis : बहुचर्चित ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा अधिकृत शुभारंभ शनिवारी बालेवाडी क्रीडा संकुलात करण्यात आला.

पुणे: आई आणि बहिणीचे प्रेम कशानेही विकत घेता येत नाही, हे विरोधकांना कळत नाही. कर्नाटक, तेलंगणात विरोधकांनी योजना सुरू केली. बंद झाली. आमच्या शिवराज चव्हाण यांनी मध्य प्रदेशात सुरू केलेली योजना अजून चालू आहे. विरोधक सत्तेवर आले तर आधीच्या योजना बंद करतात हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे पुढे वेगळा परिणाम आला तर योजना बंद होतील, अशी भीती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे व्यक्त केली.  

बहुचर्चित ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा अधिकृत शुभारंभ शनिवारी बालेवाडी क्रीडा संकुलात करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, महिला बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आदी उपस्थित होते.

‘ते वसुली सरकार होते, आम्ही देणारे आहोत’देवेंद्र फडणवीस म्हणाले, की हे ‘देना’ सरकार आहे, ‘लेना’ सरकार नाही. मागचे सरकार वसुली सरकार होते. आम्ही देणारे आहोत.पूर्वीच्या योजना दलालीच्या होत्या. आमच्या महायुती सरकारने आणलेल्या योजना या फसव्या नसून पूर्णपणे पारदर्शी आहेत. योजनेत कसलीही दलाली नाही, आधार बँक खात्याला लिंक असेल तर थेट लाभार्थींच्या खात्यात पैसे जमा होतात, इतकी सुटसुटीत पद्धत पंतप्रधान मोदी यांनी सुरू केली आहे.

भावांनाही वीजमाफी केली : अजित पवारउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पुढची ५ वर्षे योजना सुरू ठेवायची तर आगामी निवडणुकीत आमची निवडणूक चिन्हे विसरू नका,’ असे आवाहन केले. यात कसलेही राजकारण नाही, खरे तेच बोलतो, असेही ते म्हणाले. आजपर्यंतच्या राजकीय जीवनातील हा सर्वांत मोठा दिवस आहे, विरोधक कारण नसताना टीका करतात. भावांनाही वीजमाफी केली. दुधाचा दर वाढवून दिला, तरीही टीका होते. हे सरकार सर्वसामान्यांचे आहे. आम्ही कामाची माणसे आहोत. असे पवार म्हणाले.मंत्री अदिती तटकरे यांनी फक्त ४ दिवसात १ कोटी ३ लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी १५०० रुपये जमा करण्यात आल्याचे सांगून नोंदणीची मुदत सप्टेंबरपर्यंत वाढविल्याचे सांगितले. सरकारने या योजनेसाठी तयार केलेल्या जाहिरातींचेही सादरीकरण यावेळी करण्यात आले. तत्पूर्वी गायक अवधूत गुप्ते व गायिका वैशाली गुप्ते यांचा गाण्याचा कार्यक्रम पार पडला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPuneपुणे