अस्थिशल्य विशारद डॉ़ के.एच संचेती यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2017 04:35 IST2017-08-27T04:35:13+5:302017-08-27T04:35:16+5:30

पुणेकरांच्या वतीने दिल्या जाणाºया, संपूर्ण महाराष्ट्रात मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार यंदा ज्येष्ठ अस्थिशल्य विशारद डॉ़ के. एच़ संचेती यांना जाहीर झाला आहे.

Ophthalmologist Dr KH Sancheti has been awarded the Punyabhushan Award | अस्थिशल्य विशारद डॉ़ के.एच संचेती यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

अस्थिशल्य विशारद डॉ़ के.एच संचेती यांना पुण्यभूषण पुरस्कार जाहीर

पुणे : पुणेकरांच्या वतीने दिल्या जाणाºया, संपूर्ण महाराष्ट्रात मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार यंदा ज्येष्ठ अस्थिशल्य विशारद डॉ़ के. एच़ संचेती यांना जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी (दि. २७) पुरस्कार प्रदान होणार आहे.
अध्यक्षस्थानी सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील असून पालकमंत्री गिरीश बापट आणि पुण्यभूषण पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ़ रघुनाथ माशेलकर प्रमुख पाहुणे आहेत़
याच समारंभात ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचा आणि स्वातंत्र्योत्तर काळात विविध युद्धात जखमी झालेल्या वीरांचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर मुक्ता टिळक व पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ़ सतीश देसाई यांनी दिली.

Web Title: Ophthalmologist Dr KH Sancheti has been awarded the Punyabhushan Award