पुणे : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. या भारत - पाकिस्तान संघर्षादरम्यान १९ वर्षीय तरुणीने सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकली होती. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल करत अटक केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी (दि. २७) तरुणीला जामीन मंजूर केला. त्यानंतर संध्याकाळी लगेचच तिची येरवडा कारागृहातून सुटका केली. पोलिस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी ही माहिती दिली.
उच्च न्यायालयाने कठोर कारवाई करून विद्यार्थिनीला गुन्हेगार बनवायचे आहे का? असा प्रश्न उपस्थित केला. होता. पोलिस अधिकारी आणि महाविद्यालय या तरुणीचे आयुष्य उद्ध्वस्त करू पाहात आहे, असे ताशेरे न्यायालयाने ओढले होते. बुधवारी (दि. २८) पोलिस संरक्षणात तरुणी महाविद्यालयात गेली होती. तसेच तिने परीक्षाही दिली, अशी माहिती पोलिसांनी दिली. न्यायालयाने तिला जामीन मंजूर करताच तिची सुटका करण्यात सांगितले.
परीक्षेला बसू द्यावेसंबंधित तरुणीला ती शिकत असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयानेही काढून टाकले होते. या निर्णयाविरोधात तिने न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने महाविद्यालयातून काढून टाकण्याच्या निर्णयालाही स्थगिती देत, तिला परीक्षेला बसू द्यावे, हॉल तिकीट द्यावे, असे निर्देश दिले होते.