चाकणला एकतानगर येथे सिग्नल यंत्रणा कार्यन्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:14 IST2021-06-16T04:14:22+5:302021-06-16T04:14:22+5:30
चाकण शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या संख्येने रहिवासी इमारती बांधल्या गेल्याने हजारो लोक राहत आहेत. मात्र, सेवारस्ता ...

चाकणला एकतानगर येथे सिग्नल यंत्रणा कार्यन्वित
चाकण शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या संख्येने रहिवासी इमारती बांधल्या गेल्याने हजारो लोक राहत आहेत. मात्र, सेवारस्ता नसल्याने येथील लोकांना ये-जा करण्यासाठी महामार्गाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करावा लागत आहे. यामुळे आजपर्यंत लहान-मोठे अपघात घडून अनेक जणांचे बळी गेले, तर काही जण कायमस्वरूपी जायबंदी झाले आहेत. यासाठी एकतानगर येथे रस्त्यावर सिग्नल यंत्रणा बसवून वाहतूक नियंत्रक करण्यासाठी पोलीस कर्मचारी नियुक्त करण्याची मागणी, आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे नागरिकांनी केली होती.
सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग विकास मंडळ, तसेच रस्त्याची देखभाल करणाऱ्या आयआरबीच्या माध्यमातून चाकण वाहतूक पोलिसांच्या परवानगीने एकतानगर येथे सिग्नल यंत्रणा बसवून कायमस्वरूपी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आले आहे. याचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी रणजित जरे, युवक नेते सागर बनकर, व्येंकटेश सोरटे, वसंत भुजबळ, भानुदास पोटवडे, पोपट तावरे, मयूर परदेशी यांच्यासह एकतानगर मित्रमंडळाचे कार्यकर्ते यांनी विशेष प्रयत्न केले आहे.
फोटो - चाकण येथील एकतानगर येथे सिग्नल यंत्रणेचे उद्घाटन करताना.