शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

खुलेआम फसवणुक..! जुन्नर तालुक्यात बनावट औषधांच्या विक्रीबरोबर चोरट्यांचा सुळसुळाट..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 6:29 PM

अनाधिकृत पाले टाकून वस्ती करणारे व गावात तात्पुरती दुकाने मांडून ,प्रमाणित नसलेली आयुर्वेदिक औषध देणाऱ्या ठकांची संख्या वाढत आहे.

ठळक मुद्देअल्प काळासाठी रस्त्यावर,कधी गावातील बाजार तळाच्या रस्त्यावर दुकाने मांडतात.ब्रॅण्डेड औषध कंपन्यांचे लेबल लाऊन बनावट औषध विक्री

ओतूर : जुन्नर तालुक्यात जे महामार्ग व प्रमुख रस्त्यावरील  मोकळ्या माळरानावर अनाधिकृत पाले टाकून वस्ती करणारे व गावात तात्पुरती दुकाने मांडून ,प्रमाणित नसलेली आयुर्वेदिक औषध देणाऱ्या ठकांची संख्या वाढत आहे. ब्रॅण्डेड औषध कंपन्यांचे लेबल लाऊन बनावट औषध विक्री करण्याच्या गुन्ह्याबरोबर या टोळीमध्ये आता थेट घरात घुसून चोरी करणारे चोर आणि आणि सोन्याला पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने सोने ढापणारे सराईत चोरांचाही समावेश झाला आहे. त्यामुळे गावात व बाहेर पालं टाकून आलेल्या लोकांची पोलिसांनी कसून चौकशी करावी अशी मागणी होत आहे.आयुर्वेदिक औषध, विक्रेते आयुर्वेद नावाखाली विविध वनस्पतींची चुर्ण, लाकडाचे रंगी बेरंगी तुकडे छोट्या बरण्या मध्ये भरुन अल्प काळासाठी रस्त्यावर,कधी गावातील बाजार तळाच्या रस्त्यावर दुकाने मांडून बसतात. निरनिराळ्या रोगांची नावे घेऊन त्यांच्यावर रामबाण  औषध त्यांच्याकडे उपलब्ध सांगतात. त्याच्या वाकचातुर्यावर लोक फसतात. विशेषत: गावातल्या साध्या भोळ्या माणसांना त्यांच्या बोलण्याच्या जाळ्यात अडकवून सुमारे हजारभर रुपयांची औषधे त्यांच्या गळ्यात घालतात. ग्राहकांना फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यावर पुन्हा त्याच्याकडे जाण्याची सोय नसते. कारण तोपर्यंत त्याने दुसऱ्या गावात त्याचे बस्तान हलविलेले असते व काही दिवसांनंतर त्याच ठिकाणी दुसराच कोणीतरी पुन्हा येऊन तोच व्यवसाय करत असतो.  या फिरत्या आयुर्वेदिक औषध विक्रेत्याकडे बंदिस्त टेम्पो असून ते जेथे पाल ठोकून राहतात. तेथेच हे  टेम्पो मुक्कामी उभे असतात. ते टेम्पो म्हणजे जणू त्यांचे घरच बनलेले आहेत.  काही औषध विक्रेते दुचाकी घेऊन ग्रामीण भागातील वाड्या वस्त्यावर जाऊन ही प्रमाणित नसलेली कंपनी लेबल नसलेली आयुर्वेदिक औषध म्हणून विक्री करून लुट करत आहेत. फसवणूक झालेली आपले हासे होईल म्हणून गप्प बसतात पोलिसांकडे जात नाहीत. त्यामुळे या औषध विक्रेत्यांचे फावले आहे.

टॅग्स :Junnarजुन्नरmedicineऔषधंCrime Newsगुन्हेगारी