उघड्यावरील पदार्थ खाताय, सावधान...!

By Admin | Updated: August 18, 2015 03:37 IST2015-08-18T03:37:55+5:302015-08-18T03:37:55+5:30

बाजूने वाहणारे दुर्गंधीयुक्त गटार, रोगराई पसरवणाऱ्या माशांचे घोंगावणे, अस्वच्छ कामगार अशा स्थितीत खाद्यपदार्थ तयार केले जातात. ते उघड्यावर

Open foods, careful ...! | उघड्यावरील पदार्थ खाताय, सावधान...!

उघड्यावरील पदार्थ खाताय, सावधान...!

सचिन देव, पिंपरी
बाजूने वाहणारे दुर्गंधीयुक्त गटार, रोगराई पसरवणाऱ्या माशांचे घोंगावणे, अस्वच्छ कामगार अशा स्थितीत खाद्यपदार्थ तयार केले जातात. ते उघड्यावर ठेवून विक्री केली जाते, हे विदारक वास्तव नेहरुनगर, संत तुकारामनगर, खंडोबा माळ मंदिर, आकुर्डी आणि डांगे चौक, थेरगाव या परिसरात पाहावयास मिळते आहे. आरोग्याशी खेळण्याचा प्रकार सुरू असताना अन्न भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
शहराच्या विविध भागांत गलिच्छ ठिकाणी, अशुद्ध वातावरणात सर्रासपणे उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री होत असून, या पदार्थांमुळे नागरिकांना विविध आजार बळावण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शहराच्या विविध भागांत काठे हातगाडी, तर कोठे स्टॉल, टपऱ्या लावून खाद्यपदार्थांची राजरोसपणे उघड्यावर विक्री केली जात आहे. अन्नपदार्थ झाकून ठेवण्याची कोणी दक्षता घेत नाही. विक्रेत्यांना अन्न व औषध प्रशासनाने फक्त विक्रीचा परवाना दिला आहे.

खंडोबा मंदिराच्या समोरच विविध खाद्यपदार्थ विक्रीच्या हातगाड्या लागल्या आहेत. विक्रेते उघड्यावरच वडापाव, समोसा, कचोरी, भजी विक्री करताना दिसून आले. कुठल्याही विक्रेत्याने पदार्थावर सुरक्षेच्या दृष्टीने झाकण ठेवलेले नव्हते, तर सर्वच हातगाड्यांच्या बाजूला कचऱ्याची घाण साचलेली दिसून आली. अत्यंत दुर्गंधीचे वातावरण या ठिकाणी दिसून आले. शहरातील विविध खाद्यपदार्थ विक्रेत्या स्टॉलची पाहणी केली. अनेक ठिकाणी स्टॉलवर काम कारणारे कामगार धूम्रपान करणारे, तंबाखू , बिडी, सिगारेटचे व्यसन करणारे आढळून आले. एका ठिकाणी तर वडापाव बनविणारा कामगार एका हाताने तंबाखू चोळत होता, तर दुसऱ्या हाताने वडे तळत होता.

Web Title: Open foods, careful ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.