शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजप सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेच्या खुल्या चौकशीचा पुण्यात 'फुसका बार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 19:53 IST

पुणे जिल्ह्यात कामे जास्त, तक्रारी कमी... 

पुणे :  पुणे जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तब्बल 22 हजार 523 कामे झाली असताना मंगळवार (दि.2) रोजी जलयुक्त शिवार योजनेच्या खुल्या चौकशीसाठी केवळ चार तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारी दाखल करण्यासाठी पुरेसा वेळ दिला नसल्याचे सांगत तक्रारदारांनी पुन्हा संधी देण्याची मागणी केली. त्यानुसार खुल्या चौकशी समितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजयकुमार यांनी 5 मार्च रोजी पुन्हा वेळ देणार असल्याचे स्पष्ट केले. 

भाजप सरकारच्या काळात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात काम झाले. परंतु ही कामे करताना मोठा भ्रष्टाचार झाल्याचे व चुकीची कामे झाल्याच्या तक्रारी झाल्याचे सांगत राज्यातील महाआघाडी सरकारने थेट जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजयकुमार यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती नियुक्त केली. राज्य शासनाच्या आदेशानुसार जलयुक्त शिवार योजनेची खुली चौकशीसाठी पुणे जिल्ह्यातील जलयुक्त शिवार अभियान संदर्भातील तक्रारींचा आढावा व तक्रारदारांना समक्ष निवेदन मांडण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवार (दि.2) रोजी दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत सभा आयोजित करण्यात आली होती. पुणे जिल्ह्यात भाजप सरकारच्या काळात तब्बल 22 हजार 523 अशी मोठ्याप्रमाणात कामे झाली. त्यामुळे जलयुक्त शिवार योजने अंतर्गत अनेक तक्रारी येतील अशी अपेक्षा होती. पण मंगळवारी संपूर्ण जिल्ह्यातून केवळ चारच तक्रारी दाखल झाल्या आहेत. 

याबाबत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे यांनी सांगितले की, मंगळवारी जिल्ह्यातील हवेली, इंदापूर,  आंबेगाव आणि भोर तालुक्यातील प्रत्येकी एक तक्रार दाखल झाली आहे. आता येत्या 5 मार्च रोजी पुन्हा एकदा तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाState Governmentराज्य सरकारJalyukt Shivarजलयुक्त शिवार