शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

गावांचा गाडा महिलाच हाकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायत रणधुमाळी संपल्यानंतर सर्वांचे लक्ष सरपंच आरक्षणाकडे लागले होते. या आरक्षणाची प्रतीक्षा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : जिल्ह्यातील ग्रामपंचायत रणधुमाळी संपल्यानंतर सर्वांचे लक्ष सरपंच आरक्षणाकडे लागले होते. या आरक्षणाची प्रतीक्षा शुक्रवारी संपली. तालुक्याच्या ठिकाणी निघालेल्या सोडतीत अनेक जागा महिलांसाठी राखीव निघाल्याने गावगाड्याचा कारभार या महिला हाकणार असल्याचे स्पष्ट झाले. पूर्वी असलेल्या आरक्षणात नव्याने काढण्यात आलेल्या सोडतीत काही मोजके बदल झाल्याने अनेकांना संधी तर काहींची संधी हुकणार आहे.

जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींची मदत डिसेंबरअखेर संपत होती. या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया जानेवारी महिन्यात पार पडली. जवळपास महिनाभर निवडणुकीची रणधुमाळी चालली होती. मात्र, निवडणुकीपूर्वी सरपंचपदाचे आरक्षण सोडत रद्द करण्यात आली होती. ती ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्यावर जाहीर करण्यात येईल, असे आदेश ग्रामविकास विभागाने दिले होते. यामुळे अनेक इच्छुकांचे नियोजन कोलमडले होते. असे असतानाही ते निवडणुकीला सामोरे गेले होते. निवडणूक निकालानंतर सदस्य निवडून आले. यामुळे आता गावाचे नेतृत्व कोण करणार याचे वेध १८ तारखेनंतर निवडून आलेल्या उमेदवारांना लागले होते. यामुळे सरपंच आरक्षण सोडतीकडे सर्वांचे लक्ष होते.

जिल्ह्यातील १४०७ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत शुक्रवारी काढण्यात आली. रद्द करण्यात आलेल्या सोडतीमधील महिला आणि ओबीसी प्रवर्गातमधील थोडेफार बदल वगळता पूर्वी काढण्यात आलेले आरक्षण बहुतांश ठिकाणी कायम राहिले आहे.

चौकट

सरपंचपदाचे यापूर्वी काढण्यात आलेले आरक्षण रद्द करण्यात आले होते. यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये कोणताही बदल झालेला नाही. मात्र, महिला आणि ओबीसी आरक्षणासाठी थोड्या ठिकाणी सोडती काढाव्या लागल्या. त्यामुळे तालुक्यांचा विचार करता अगदी मोजक्याच ठिकाणी आरक्षणामध्ये बदल झालेले आहेत.

_____

आठवडाभरात सरपंच निवडणुका

सरपंच आणि उपसरपंच निवडणुकीसाठी येत्या आठवडाभरात तारखा जाहीर केल्या जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाकडून निवडणुकीच्या तारखा आणि निवडणूक निर्णय अधिकारी निवडणुकांच्या प्रक्रियेला सोमवारपासून सुरुवात होईल. निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांना पहिल्या सभेची नोटीस दिली जाईल. त्यानंतर ८ दिवसांनी प्रत्यक्ष उपसरपंच आणि उपसरपंच निवडणूक होईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी सांगितले.

चौकट

जिल्ह्यात ७४८ ग्रामपंचायतींची निवडणूक १५ जानेवारीला झाली. त्यानंतर १८ जानेवारी रोजी मतमोजणी झाली. यामध्ये निवडून आलेल्या नवनिर्वाचित सदस्यांची अधिसूचना ग्रामपंचायत अधिनियम कलम ३७ प्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली. त्यामुळे सरपंच आरक्षण सोडतीनंतर आता लवकरच सरपंचपदाच्या निवडणुकादेखील जाहीर केल्या जाणार आहेत.