शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

पोलीस लाईनमध्ये येते तीन दिवसांतून वीस मिनिटे पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2019 11:49 AM

नागरिकांना त्रास : अधिकाऱ्यांचा मात्र पुरवठा सुरळीत असल्याचा दावा..

ठळक मुद्देसोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये चारशे कुटुंबीय वास्तव्यास

पुणे : सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये चारशे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. मागील सहा महिने या भागात तीन दिवसांतून एकदा फक्त वीस मिनिटे पाणी येते, असे येथील नागरिकांनी सांगितले. मात्र महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी पाणीपुरवठा सुरळीत चालू असल्याचा दावा करत आहेत. पाणी नक्की मुरतंय कुठं असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये आठ इमारती आणि पाच बैठी घरांची लाईन असे मिळून चारशे कुटुंबीय वास्तव्यास आहेत. या भागात महानगरपालिकेच्या तीन लाख लिटरच्या दोन टाक्या आहेत. तर प्रत्येक इमारतीवर दोन टाक्या बांधून दिल्या आहेत. पर्वती जलशुद्धीकेंद्रावरून येथे पाणीपुरवठा होत असतो. त्यांनतर या दोन टाक्यांमध्ये पाणी भरले जाते. पुढे पाणी मोटरच्या साहाय्याने इमारतीच्या टाकीमध्ये सोडले जाते.उन्हाळ्यापासून आम्ही या समस्येला सामोरे जात आहोत. सहा महिन्यांपूर्वी देखील अशीच स्थिती होती. तेव्हा तीन दिवसांतून एकदाच पाणी येत होते. पण ते एक तासभर येत असे. आता मात्र वीस मिनिटे पाणी येते. महानगरपालिकेच्या टाक्या पूर्ण भरत नाहीत. तर इमारतीवरील टाक्या कशा भरतील असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. स्थानिक नगरसेवक आणि आम्ही सर्वांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार केली. पालिकेचे अधिकारी येऊन पाहणी करून जातात. पण त्यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा काढत नाहीत...................सोमवार पेठ पोलीस लाईनमध्ये पर्वती आणि लष्कर जलशुद्धीकरण केंद्रावरून पाणीपुरवठा केला जातो. दररोज आमच्याकडून ११ ते ३ यावेळेत सुरळीत  पाणीपुरवठा होतो. पूर्ण पोलीस लाईनमध्ये पाणी पुरवण्याचे काम त्या भागात नेमून दिलेला लाईन दफेदार करतो. त्या भागातील नागरिकांनी पाण्याचे मीटरही बसवून दिले आहेत. पण ते नादुरुस्त आहेत. त्यामुळे त्यांचा पाण्याचा वापर अथवा त्यांना पाण्याची किती गरज आहे. हे आम्हाला कळत नाही. शहराला पाणी सोडणाºया वॉलने पोलीस लाईनीत पाणी सोडले जाते. पाणीपुरवठा सुरळीत नियोजित वेळेत पुरवला जातो. याची आमच्याकडे नोंदी आहेत.- सूर्यकांत जमदाडे, उपअभियंता स्वारगेट पाणीपुरवठा केंद्र

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका