आव्हाने स्वीकारतील तेच टिकतील
By Admin | Updated: October 26, 2015 01:36 IST2015-10-26T01:36:12+5:302015-10-26T01:36:12+5:30
शब्दातून ज्या प्रमाणे संवाद साधला जातो त्याचप्रमाणे चित्रांतूनही संवाद साधता जातो. शब्दांपेक्षा प्रभावी अशी मनिषा वेदपाठक यांची छायोचित्रे आहेत.

आव्हाने स्वीकारतील तेच टिकतील
पुणे : शब्दातून ज्या प्रमाणे संवाद साधला जातो त्याचप्रमाणे चित्रांतूनही संवाद साधता जातो. शब्दांपेक्षा प्रभावी अशी मनिषा वेदपाठक यांची छायोचित्रे आहेत. रंगांची ही वेगळी भाषा आहे, असे मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यक्त केले. कलेच्या क्षेत्रातील आव्हाने जे स्वीकारतील तेच टिकतील असेही ते म्हणाले.
मनिषा वेदपाठक यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन बाणेमधील लेट आर्ट वर्ल्ड येथे भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे रविवारी सायंकाळी तेंडुलकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. १ नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन खुले असणार आहे. वेदपाठक यांचे दोन दशके वास्तव्य आफ्रिकेत होते. त्यांची छायाचित्रे आफ्रिकन संस्कृतीने नटलेली आहेत. त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर पश्चिम आफ्रिकेतील घाना, अमेरिका, इटली येथील अनेक प्रदर्शने गाजली आहेत. केवळ अर्थार्जन एवढाच दृष्टीकोन न ठेवता समाजातील आॅटिस्टिक मुलांसाठी त्या कार्यरत असतात. चित्राच्या विक्रीतून मिळणारे काही उत्पन्न ते स्वमग्न मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थेला देणार आहेत.
वेदपाठक यांच्या कलेचा आणि कलाकृतींचा गौरव करुन तेंडुलकर म्हणाले, ‘‘ही चित्रे पाहिल्यानंतर असे जाणवते की अनेक रंगातून अर्थपूर्ण शब्द निर्माण होत आहेत.
(प्रतिनिधी)