शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

.... तरच ‘कौटुंबिक’लॉकडाऊन सुखाचा..! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 21:55 IST

आजच्या या कठीण परिस्थितीत त्यात थोडा बदल करुन दुर्लक्ष करणारी व्यक्ती सुखी..

आमच्या शेजारी राहणा-या आजी रात्री मला फोनवर सांगत होत्या कि, बघ ना,नातीने आत्ता रात्री आठ वाजता वॉशिंग मशीन लावलंय, आणि कानात इअरफोन अडकवून तो लॅपटॉप समोर घेऊन बसलीय.आता रात्री अपरात्री धुणं वाळत घालेल. काळ वेळेचं काही भान नाही. आजींचा त्रागा ऐकून मी म्हटले,आजी, तुम्ही दुर्लक्ष करा... ते एवढं सोप्प आहे?  आज ' लॉकडाऊन 'मुळे सध्या सगळी मंडळी घरीच आहेत.एकमेकांसोबत वेळ घालवायला मिळणं हे भाग्य असले तरी सदासर्वकाळ एकत्र राहाण्याने काही प्रश्न नक्कीच निर्माण झालेत. ताणाच्या या परिस्थितीत एकमेकांच्या उणिवा प्रकर्षांने समोर येत आहेत.या काळात आपल्या सगळ्यांनाच आपलं मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवायचे आहे..आजच्या या कठीण परिस्थितीत त्यात थोडा बदल करुन दुर्लक्ष करणारी व्यक्ती सुखी असे म्हणावेसे वाटते...  आज घरातल्या गृहिणीवर अतिरिक्त ताण आलाय. ती तिच्या ऑफिसचे काम घरुन करत असेल तर तिला दोन्ही आघाड्यांवर कार्यरत राहावे लागतयं. पण ती केवळ गृहिणी असेल तरी तिचे काम वाढलेले आहेच कारण कामवाल्या बायका आज मदतीला नाहीत. त्यामुळे घरात कामाच्या वाटणीला पर्याय नाही, हे सत्य आहे. प्रत्येकाने समजून उमजून आपली जबाबदारी ओळखून कामाचा वाटा उचलायला हवा.महत्वाचे हे की कामांची एकदा वाटणी झाली की परस्परांनी त्यात ढवळाढवळ करायची नाही. हे ठरवून टाका. नवरा,मुलं यांना कामं सोपवून दिली की ते त्यांच्या पध्दतीने करतील. फारतर एकदा आठवण करुन द्यायला हरकत नाही. पण ती कामं पूर्ण करायची त्यांची जबाबदारी हे एकदा ठरवून टाकायचे. घरात पसारा पडलाय.कोण येतयं आता घरी? म्हणून तिकडे कोणाचेच लक्ष नाही.आपण केवळ त्रागा करुन उपयोगी नाही. मुलांना चारवेळा पसारा आवरा सांगायचे, ती आपलं ऐकत नाहीत. चिडचिड करण्याखेरीज काहीच होत नाही. मग शेवटी आपणच उचलून ठेवतो. त्यापेक्षा आधीच उचलला असतां तर? चिडचिड त्रागा वाचला असता.वातावरण देखील डिस्टर्ब झालं नसतं. हे अगदी शंभर टक्के बरोबर आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर नाही हे मला मान्य आहे.

पण आत्ता या दिवसात आपल्याला मानसिक शांतता हवी आहे. त्यासाठी हा एक लहानसा प्रयत्न आहे. कारण आत्ता घरात नसते वादविवाद नको आहेत. त्यामुळे मी म्हटल्याप्रमाणे काही दिवस थोडे फार दुर्लक्ष करायला काय हरकत आहे? भांडी अगदी लखलखीत स्वच्छ नाही निघाली, धुणं नीट न झटकता वाळत घातले गेले? तर फारसं काही बिघडत नाही. त्यामुळे तिकडे सरळ सरळ दुर्लक्ष करणे केव्हाही श्रेयस्कर.दुसरा महत्वाचा मुद्दा आहे सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह असण्याचा. हातात वेळ आहे दुसरं काही काम नाही म्हणून सतत कोणता ना कोणता तरी स्क्रिन डोळ्यांसमोर असणं हे तितकेसे बरं नाही. घरातल्या मंडळींशी गप्पा टप्पा न मारता केवळ आभासी जगात रमणं तितकेसे बरोबर नाही. दिवसातला काही ठराविक काळ तरी एकत्र घालवा. चहा,नाष्टा,जेवण,चॅनल्स वरील एखादी मालिका सगळ्यांनी मिळून पहा. त्यांवर चर्चा करा.या सगळ्या बरोबर अजून एक महत्त्वाचे ते म्हणजे स्वताचा स्वताशी संवाद असणं आवश्यक. आपल्याला आवडेल ती गोष्ट मग ते वाचन असो की शिवणकाम, लिखाण यांसह काहीही असो,आपल्या आवडीचे काहीही आवर्जून करणे व त्यासाठी वेळ देणे महत्वाचे. हाताशी वेळ आहे तर नवनवीन गोष्टी करुन बघतां येतील. जुन्या काही गोष्टी आठवून बघा. पूर्वी कामाच्या व्यापात, संसाराची जबाबदारी निभावताना जे काही आवडीचे करायचे राहून गेले आहे ते पुन्हा सुरु करता येईल.त्या निमित्ताने आपली बकेट लिस्ट पुन्हा एकदा नव्याने तयार करता येईल. स्वत:ची आवड, एकटेपणा जपायला हवा. तरच हे दिवस आनंदाचे, शांततेचे जातील. आणि पर्यायाने पुढीलकाळात देखील कौटुंबिक स्वास्थ जपले जाईल.

- अ‍ॅड. भाग्यश्री चौथाई 

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्यMeditationसाधना