शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

आश्वासने केवळ हवेत : अजित पवार; सरकारच्या विरोधात राष्ट्रवादीचा पुण्यात हल्लाबोल मोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 16:12 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सरकारच्या निषेधार्थ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देविरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न : अजित पवार नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी हल्लाबोल आंदोलनाचा होणार समारोप

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सरकारच्या निषेधार्थ माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यव्यापी हल्लाबोल आंदोलनाचा एक भाग म्हणून अलका टॉकीज चौकापासून जिल्हाधिकारी हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी शहराध्यक्ष खासदार वंदना चव्हाण, विरोधी पक्षनेते चेतन तुपे, प्रदेश प्रवक्ते अंकुश काकडे, नगरसेवक सुभाष जगताप, महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव, अश्विनी कदम, नंदा लोणकर, वैशाली बनकर, चंचला कोद्रे, सुहास उभे उपस्थित होते. राज्य सरकारने दिलेली आश्वासने गेल्या ३ वर्षात पूर्ण केली नाहीत. त्याऐवजी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे अशी जोरदार टीका अजित पवार यांनी यावेळी केली. मोर्चामध्ये महिला मोठया संख्येने सहभागी झाल्या होत्या. जीएसटी रद्द झालाच पाहिजे, दुधाला भाव मिळायलाच हवा, अशा प्रकारचे फलक मोर्चातील कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नागपूर येथे १२ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत हल्लाबोल आंदोलनाचा समारोप होणार आहे. 

 

आरोपींना लवकरात लवकर फाशी द्यावीकोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना न्यायालयाकडून ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेचे अजित पवार यांनी स्वागत केले. न्यायालयीन प्रक्रियेत जास्त वेळ न घालविता या तिघा आरोपींना लवकरात लवकर फाशी लटकविण्यात यावे, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार