शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

महायुती लाडकी बहीण नावाने फक्त मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी; सुषमा अंधारे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2024 09:18 IST

पुणे : लाडकी बहीण नावाने सध्या मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू असून नागरिकांची गोंधळलेली अवस्था झाली आहे. भावाने केलेल्या मदतीची ...

पुणे : लाडकी बहीण नावाने सध्या मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरू असून नागरिकांची गोंधळलेली अवस्था झाली आहे. भावाने केलेल्या मदतीची कधीही जाहिरात केली जात नाही. गोरगरिबांचे शोषण करून विविध माध्यमातून जमा केलेला कर हा आपलाच पैसा आहे. लाडकी बहिणी योजनेतून तो परत येत आहे. राज्यात महागाई, बेरोजगारी, गुन्हेगारी अशा अनेक समस्या आहेत. तीन वर्षाची मुलगी असो की 70 वर्षाची आजी सुरक्षित नाही. बलात्कारांच्या मोठ्या प्रमाणात घटना घडत आहेत. भाजपशी संबंधित कुठल्याही घटनेत गुन्हा दाखल होत नाही. रात्री - अपरात्री घडणाऱ्या गुन्हेगारी घटना दिवसाढवळ्या समाज माध्यमांसमोर आणि पोलीस स्टेशन मध्ये घडत आहेत. कोयता गँग चा हैदोस, पोलिस सुरक्षित नाहीत. असे नाव घेत विविध मुद्द्यावरती महायुती सरकारवर यांच्यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी सोमवारी प्रचार सांगताच्या शेवटच्या टप्प्यात जहरी टीका केली.महाविकास आघाडी उमेदवार अश्विनी नितीन कदम यांच्या प्रचारार्थ शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची प्रचार सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार मोहन जोशीं,अंकुश काकडे, माजी नगरसेवक बाळासाहेब ओसवाल,अशोक हरणावळ,स्वाती पोकळे,भगवानराव साळुंखे,शहर अध्यक्ष मृनाली वाणी, राहुल तुपेरे,शैलेद्र नलावडे, शशिंकात तापकीर,सुरज लोखंडे,अमोल रासकर,सचिन देडे,सचिन जोगदंड,तुषार नांदे,ऋषिकेश भुजबळ,निलेश पवार,लखन वाघमारे,अमोल ननावरे,संजय दामोदरे,अमोल परदेशीझ निलेश खंडाळे,सतीश पवार,पुष्कर अबनावे,बाळासाहेब अटल,भरत सुराणा,सचिन पासळकर,अनिल सातपुते,रवी ननावरे आदी महाविकास आघाडी व मित्र पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.यापुढे बोलताना अंधारे म्हणाल्या,"भाजपाचे नेते महिला संदर्भात अतिशय खालच्या पातळीवर जाऊन गलिच्छ भाषा वापरतात. आया - बहिणींची अब्रू सुरक्षित ठेवण्यासाठी, बेरोजगार हातांना काम देण्यासाठी, महागाईचा दर कमी करण्यासाठी, गुंडशाही दडपशाही चा बंदोबस्त करण्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी "तुतारी वाजवणारा माणूस" या चिन्हसमोरील बटन दाबून अश्विनी नितीन कदम यांना विजयी करण्याचे आवाहन शिवसेना नेते सुषमा अंधारे यांनी केले.यावेळीमहाविकास आघाडी उमेदवार अश्विनी नितीन कदम यांनी मागील पंधरा वर्षातील आपल्या कामाचा आढावा मतदारांना सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्निल खडके यांनी केले. आभार शिवसेना विभाग प्रमुख सुरज लोखंडे यांनी मांडले. यावेळी महिलांची संख्या लक्षणीय होती.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sushma Andhareसुषमा अंधारेladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे