मोरगावला पाच तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:10 IST2021-04-22T04:10:33+5:302021-04-22T04:10:33+5:30

येथील मयुरेश्वर हॉस्पिटल कोविड केंद्रामध्ये ४२ रुग्ण कोरोना उपचार घेत आहेत. पैकी १२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. हॉस्पिटलला उपलब्ध ...

Only five hours of oxygen left for Morgaon | मोरगावला पाच तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक

मोरगावला पाच तास पुरेल एवढाच ऑक्सिजन शिल्लक

येथील मयुरेश्वर हॉस्पिटल कोविड केंद्रामध्ये ४२ रुग्ण कोरोना उपचार घेत आहेत. पैकी १२ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. हॉस्पिटलला उपलब्ध ऑक्सिजन केवळ चार ते पाच तास टिकेल एवढाच शिल्लक असल्याची माहिती हॉस्पिटलचे डॉक्टर पवार यांनी सांगितले. ऑक्सिजन उपलब्ध करुन मिळणेबाबत बारामती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याशी हॉस्पिटल व्यवस्थापनाने संपर्क साधला आहे.

मोरगाव येथील वेल्डिंग व्यावसायिकांस ऑक्सिजन सिलिंडर शिल्लक असल्यास मदत करण्याचे आवाहन हॉस्पिटलकडून करण्यात येत आहे. ऑक्सिजन मिळण्यासाठी शासन व खाजगी पातळीवर या कोविड सेंटरकडून प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र कोठेही ऑक्सिजन उपलब्ध न झाल्यास रुग्णांना इतर ठिकाणी अधिक उपचारासाठी हलवावे अशी पूर्वसूचना दिली असल्याने नातेवाईक व रुग्ण धास्तावले आहेत.

Web Title: Only five hours of oxygen left for Morgaon