रस्त्यावर फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:10 IST2021-04-11T04:10:34+5:302021-04-11T04:10:34+5:30
हडपसर, ससाणेनगर, मगरपट्टा, रामटेकडी, साडेसतरानळी, फुरसुंगी, मुंढवा, केशवनगर, शेवाळेवाडी आदी परिसरातील सर्व दुकाने कडकडीत बंद होती. त्यामुळे रस्त्यावर ...

रस्त्यावर फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहतूक
हडपसर, ससाणेनगर, मगरपट्टा, रामटेकडी, साडेसतरानळी, फुरसुंगी, मुंढवा, केशवनगर, शेवाळेवाडी आदी परिसरातील सर्व दुकाने कडकडीत बंद होती. त्यामुळे रस्त्यावर अत्यावश्यक सेवेतील तुरळक वाहने धावत होती.
पोलिसांचा खडा पहारा असल्यामुळे रस्त्यावर नागरिक आणि वाहनांची वर्दळ नव्हती. अत्यावश्यक सेवेतील मेडिकल आणि हॉस्पिटलची सेवा सुरळीत सुरू होती. रुग्णांच्या नातेवाईकांची औषधे मिळवित हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी धावपळ सुरू होती. हॉस्पिटलमध्ये रुग्णांबरोबर नातेवाईकांची मोठी गर्दी दिसत होती.
पुण्याच्या पूर्व भागात हडपसरमध्ये कोरोनाचा हॉट्स्पॉट होत आहे. नागरिक दक्षता घेत आहेत. मात्र, रुग्ण आणि नातेवाईकांवर उपचारासाठी प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. कारण उपचारासाठी रुग्णालयामध्ये साध्या बेडपासून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आणि अतिदक्षता विभाग तयार करण्याची हडपसरमध्ये वेळ आली आहे.
आता रुग्णांना वेळेत उपचारची गरज आहे. महापालिका प्रशासनाने रुग्णांना व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यासाठी तातडीची यंत्रणा उभी करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी अनेक संस्था, संघटना आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे. कोविड सेंटर सुरू करून नागरिकांना उपचाराची सुविधा अत्यंत िनिकडीची आहे.