तोडफोडीचा घोष यांचा धनादेश वाऱ्यावरच

By Admin | Updated: April 28, 2017 06:00 IST2017-04-28T06:00:51+5:302017-04-28T06:00:51+5:30

स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी केलेल्या तोडफोडीच्या बदल्यात भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस गणेश घोष यांनी दिलेला

Only the check marks of the blast of Ghosh are on the wind | तोडफोडीचा घोष यांचा धनादेश वाऱ्यावरच

तोडफोडीचा घोष यांचा धनादेश वाऱ्यावरच

पुणे : स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी केलेल्या तोडफोडीच्या बदल्यात भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस गणेश घोष यांनी दिलेला ५१ हजार रुपयांचा धनादेश हवेतच राहण्याची चिन्हे आहेत. असा धनादेश वटवण्यासाठी महापालिकेत कसेलच हेड (शीर्षक) नाही. त्यातच घोष यांनी महापौर, पुणे महापालिका अशा नावाने धनादेश दिला आहे व या नावाचे खातेच महापालिकेत नाही.
स्वीकृत नगरसेवक निवडीच्या वेळी घोष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिका कार्यालयात तोडफोड केली. त्याची नुकसान भरपाई म्हणून घोष यांनी महापौरांना ५१ हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र आता घोष यांचाच धनादेश वटवण्यात अडचणी येत आहेत. महापौरांच्या नावे कोणत्याही बँकेत महापालिकेचे खाते नाही. त्यामुळे घोष यांना हा धनादेश नाव बदलून द्यावा लागेल. तो त्यांनी आयुक्त, महापालिका या नावे दिला तर तो जमा होऊ शकतो. कारण महापालिकेची सर्व बँकांमधील खाती याच नावाने आहे, मात्र त्यातही अडचण आहे. एखादा विभाग जोपर्यंत या धनादेशाचे चलन करून देत नाही, तोपर्यंत लेखा विभाग हा धनादेश जमा करून घेणार नाही.
कोणतेच खाते हा धनादेश त्यांच्या खात्यात जमा करून देणार नाही, कारण त्यांना त्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम कशापोटी जमा करून घेतली त्याचे स्पष्टीकरण द्यावे लागेल.

Web Title: Only the check marks of the blast of Ghosh are on the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.