Pune Fights Corona: कोरोना बाधितांपैकी चार टक्के रुग्णच रुग्णालयात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2022 14:54 IST2022-01-14T14:53:48+5:302022-01-14T14:54:10+5:30
राज्यात मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोना लक्षणीय वाढ होत आहे

Pune Fights Corona: कोरोना बाधितांपैकी चार टक्के रुग्णच रुग्णालयात
पुणे : राज्यात मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोना लक्षणीय वाढ होत आहे. पण आढळून येणाऱ्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने त्यांना गृहविलगीकरणाचा पर्याय सुचवण्यात आला आहे. शहरातील बऱ्याच नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याने कोरोनासोबत लढण्याची ताकद शरीरामध्ये दिसून येत आहे. म्हणून सक्रिय रुग्ण वाढत असले तरी केवळ ४.३४ टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल असल्याचे दिलासादायक चित्र आहे. तरीसुद्धा नागरिकांनी नियमांचे पालन करावे. असे आवाहन पुणे महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
शहरातील कोरोनाबाधितांची सक्रिय रूग्ण संख्या २५ हजार ७३७ इतकी झाली असून, एकूण कोरोना बाधितांपैकी ९०० ते १००० च्या आसपास रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत. शहरात गुरूवारी पुन्हा कोरोनाबाधितांची उच्चांकी वाढ झाली होती. दिवसभरात ५ हजार ५७१ जण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले होते. दिवसभरात १९ हजार ८६८ जणांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत बाधितांची टक्केवारी २८.०४ टक्के होती.
आतपर्यंत ५ लाख ४२ हजार ९८९ जण कोरोना बाधित आढळून आले. यातील ५ लाख ८ हजार ११९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ९ हजार १३३ जण दगावले आहेत.