शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

'म्हाडा' पुणे मंडळाच्या ४७५६ सदनिका सोडतीसाठी; ऑनलाईन अर्ज नोंदणीला प्रारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2019 21:34 IST

3 मे रोजी सकाळी 10 वाजता निघणार सोडत

मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या विविध गृहनिर्माण योजनेतील ४७५६ सदनिकांच्या विक्री सोडतीसाठी अर्जदारांची नोंदणी, ऑनलाईन अर्ज भरणे या प्रक्रियेचा शुभारंभ 'म्हाडा'चे माननीय अध्यक्ष श्री. उदय सामंत यांच्या  हस्ते आज करण्यात आला. येथील मंडळाच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला पुणे मंडळाचे सभापती समरजितसिंह घाटगे, मुख्य अधिकारी अशोक पाटील आदी उपस्थित होते.      मंडळातर्फे सोडतीकरिता प्राप्त अर्जाची संगणकीय सोडत दि. ०३ मे, २०१९  रोजी सकाळी दहा वाजता अल्प बचत भवन, ७ क्वीन्स गार्डन, कौन्सिल हॉल मागे, कॅम्प, पुणे येथे काढण्यात येणार आहे. मंडळांतर्गत उभारण्यात आलेल्या सदनिकांच्या संगणकीय सोडतींकरिता माहितीपुस्तिका व ऑनलाईन अर्ज म्हाडाच्या htpps://lottery.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.या सोडतीकरिता अर्जदारांची नोंदणी दि. ०२ मार्च, २०१९ सकाळी १२ वाजेपासून दि. १२ एप्रिल, २०१९ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत केली जाणार आहे. नोंदणीकृत अर्जदारांना दि. ०३ मार्च, २०१९ सकाळी १० वाजेपासून दि. १२ एप्रिल, २०१९ रोजी रात्री ११. वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. याच कालावधीत नोंदणीकृत अर्जदारांना अनामत रक्कम भरता येणार आहे.या सोडतीत प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तळेगाव दाभाडे (पुणे), सांगली, म्हाळुंगे (पुणे), करमाळा (जि. सोलापूर) येथील अत्यल्प गटातील १६६२ सदनिकांचा समावेश आहे.  म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत म्हाळुंगे (पुणे), बालाजी पार्क (कोल्हापूर) येथे ३०५ सदनिका अत्यल्प गटासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अल्प उत्पन्न गटाकरिता म्हाळुंगे इंगळे (पुणे), शिवाजीनगर सोलापूर, बालाजी पार्क (कोल्हापूर), दिवे (ता. पुरंदर), सांगली येथील ६१२ सदनिकांचा समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटाकरिता म्हाळुंगे इंगळे (पुणे), शिवाजी नगर सोलापूर, जुळे सोलापूर, दिवे (ता. पुरंदर) सासवड (ता. पुरंदर), सांगली, पिंपरी वाघिरे येथील  ९७३ सदनिकांचा समावेश आहे. उच्च उत्पन्न गटाकरिता जुळे सोलापूर, पिंपरी वाघिरे (पुणे) येथील ३४६ सदनिकांचा समावेश आहे.२० टक्के अंतर्गत सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगर पालिका हद्दीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी २०६ सदनिका आहेत. पिंपरी चिंचवड महानगर पालिका हद्दीत ६३९ सदनिकांचा समावेश आहे. सोडतीत यशस्वी झालेल्या अर्जदारांनीं कागदपत्रे सादर करण्यासाठी दि. ४ मे, २०१९ रोजी सकाळी १० वाजेपासून दि. ३१ मे, २०१९ रात्री ११ वाजून ५९ मिनिटापर्यंत मुदत देण्यात आली आहे. अत्यल्प उत्पन्न गटाकरिता कौटुंबिक मासिक उत्पन्न मर्यादा रू. २५,००० पर्यंत आवश्यक आहे. अल्प उत्पन्न गटाकरिता रू. २५,००१ ते रू. ५०,०००, मध्यम उत्पन्न गटाकरिता रू. ५०,००१ ते रू. ७५,००० पर्यंत आहे.  उच्च उत्पन्न गटाकरिता रू. ७५,००१ व त्यापेक्षा जास्त कौटुंबिक मासिक उत्पन्न असणे गरजेचे आहे.     सदनिकांच्या वितरणासाठी म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजन्ट नेमलेले नाही. अर्जदाराने कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये तसे केल्यास नाशिक व औरंगाबाद मंडळ कोणत्याही व्यवहारास / फसवणुकीस जबाबदार राहणार नाही, असे आवाहन 'म्हाडा'तर्फे करण्यात आले आहे.

टॅग्स :mhadaम्हाडाPuneपुणे