शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
4
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
5
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
6
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
7
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
8
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
9
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
10
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
11
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
12
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
14
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
15
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
16
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
17
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
18
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
19
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
20
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
Daily Top 2Weekly Top 5

पुणेकरांच्या डोळ्यात कांद्याने आणले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 20:37 IST

तब्बल १३० ते १५० रुपये किलो उच्चांकी दर

ठळक मुद्देउच्चांकी दर :  आयात करुनही मार्केटमध्ये कांद्याचा तुटवडा दुष्काळ आणि नंतर अवकाळी पावसाचा कांदा पिकाला मोठा फटका जुन्या कांद्याचा हंगाम संपत आल्याने परिणामदुष्काळ आणि नंतर अवकाळी पावसाचा कांदा पिकाला मोठा फटका

पुणे : दुष्काळ आणि नंतर अवकाळी पावसाचा प्रचंड मोठा फटका कांदा पिकाला बसला आहे. याचाच परिणाम म्हणून सध्या मार्केटमध्ये कांद्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. मंगळवार (दि.३) रोजी पुण्यात किरकोळ बाजारात कांदा तब्बल १३० ते १५० रुपये किलो असे उच्चांकी दराने विकला गेला. शासनाने परदेशातून कांदा आयात करुन देखील कांद्याचे दर नियंत्रित ठेवण्यास अपयश आले आहे. गुलटेकडी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कांदा-बटाटा विभागात मंगळवार (दि.३) रोडी जुना व नवीन कांद्याच्या मिळून केवळ ३० ते ४० गाड्यांची आवक झाली. नवीन कांद्याचा हंगाम सुरु झाला असला तरी अवकाळी पावसाचा मोठा परिणाम नवीन कांद्यावर झाला आहे. सध्या मागणीच्या तुलनेत मार्केट मध्ये  दाखल होणारी कांद्याची आवक खूपच कमी आहे. यामुळे घाऊन बाजारात दहा किलो जुन्या कांद्याला १३०० रुपये असा दर मिळाला. तर नवीन कांद्याला १ हजार रुपये किलोच दर फुटला. नवीन कांदा आणि जुन्या कांद्याची आवक पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातून झाली आहे. नवीन कांद्याचा हंगाम सुरू झाला असला तरी कांद्याचा दर्जा तितकासा चांगला नाही. मात्र, कांद्याची आवक मागणीच्या तुलनेत अपुरी पडत असल्याने नवीन कांद्याचे दर तेजीत आहेत़--जुन्या कांद्याचा हंगाम संपत आल्याने परिणामजुन्या कांदाच्या हंगाम संपत आला आहे. नवीन कांद्याच्या तुलनेत जुन्या कांद्याची प्रतवारी चांगली आहे. किरकोळ आणि घाऊक बाजारात कांद्याचे दर तेजीत आहे. नवीन कांद्याची आवक  साधारपणपणे दीड महिना सुरु राहिल. त्यानंतर पुढील वर्षी आॅगस्ट महिन्यात जुन्या कांद्यााचा हंगाम सुरु होईल. सद्यस्थितीत जुन्या कांद्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे मात्र तुलनेने आवक कमी होत आहे. त्यामुळे मागणी वाढली असून कांद्याला उच्चांकी दर मिळाला आहे़- रितेश पोमण, कांद्याचे व्यापारी

टॅग्स :PuneपुणेonionकांदाFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड