शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

निर्यातबंदीतही इंदापुरला कांद्याने मारली उसळी, मिळाला ४१०० रुपये क्विंटल उच्चांकी बाजारभाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2020 13:03 IST

केंद्र सरकारच्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर सर्वत्र टीका होत असून विविध ठिकाणी आंदोलने देखील होत आहे.

ठळक मुद्देनिर्यातबंदी असूनही कांदा दरात तेजी

इंदापूर (कळस):  देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारनेकांदा निर्यात करण्यास बंदी घातली. यामुळे कांद्याचे भाव कोसळतील, असा आरोप करून सर्वच पक्षांनी आंदोलने सुरू केली. मात्र इंदापुर बाजार समितीच्या येथील बाजार आवारात निर्यात बंदी असतानाही सोमवारी (दि २१)  १९२ क्विंटल कांद्याची आवक होऊन कमाल ४१०० रुपये, किमान ७०० रुपये प्रति क्टिंटल भाव मिळाला. सोमवारी प्रथमच  ४१०० क्विंटल रुपयांपर्यत उसळी मारुन उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

कांदा दरात गेल्या काही दिवसांत भावात वाढ होत आहे. भावात सुधारणा होत असल्याने कांदा उत्पादक मोठया प्रमाणावर माल विकण्यासाठी आवारात आणत आहेत. असे असले तरी यंदा वातावरणामुळे चाळीत साठवलेल्या कांदयाचे सडण्याचे प्रमाण वाढल्याने निम्मा कांदा फेकून देण्याची पाळी कांदा उत्पादकांवर आल्याने भाव वाढीने झालेल्या खर्चाचीच गोळाबेरीज होणार असल्याचे चित्र आहे. इंदापुर या ठिकाणी कांदा लिलाव वार सोमवार, बुधवार व शुक्रवारी होतो बाजार समितीमध्ये सोमवारी १९२ क्विंटल काद्यांची आवक झाली  कांद्याच्या दरात उसळी मारुन प्रति किलो ४१ दराने कांदा विक्री झाल्याने तेजी कायम राहणार असल्याचे चित्र आहे.  देशात कांद्याचा तुटवडा निर्माण झाल्याने भाव नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यात करण्यास बंदी घातली.यामुळे कांद्याचे भाव कोसळतील, असा आरोप करून अनेक पक्षांनी आंदोलने सुरू केली. लोकप्रतिनिधीनी यासंबंधी सरकारकडे पाठपुरावा करून निर्यातबंदी मागे घेण्याची मागणी करीत आहेत. बाजारात मात्र वेगळे चित्र पहायला मिळत आहे.बाजार समितीत कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांच्या कांद्यालाही चांगला भाव मिळत आहे. निर्यातबंदी होण्यापूर्वी ३० रुपये भाव मिळत होता. निर्यातबंदीचा निर्णय झाला. त्यानंतर एक दोन दिवस भाव थोडा कमी झाला होता. निर्यातबंदीचे पुढे काय होते, याची प्रतीक्षा असल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्री कमी केली. त्यातच दक्षिण भारतातून कांद्याला मागणी वाढल्याने तेथील व्यापारी महाराष्ट्रात येऊन कांदा खरेदी करत आहेत. त्या भागात पाऊस झाल्याने तेथील लाल कांदा बाजारात उपलब्ध होत नसल्याने त्यांना महाराष्टातून कांदा न्यावा लागत आहे, यामुळे निर्यातबंदी असूनही कांदा दरात तेजी आहे. 

टॅग्स :IndapurइंदापूरonionकांदाCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी