शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मार्केट यार्डात किलोमागे १० रुपयांनी उतरले कांद्याचे दर; शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 14:09 IST

गुलटेकडी येथील मार्केट यार्डात येणाऱ्या कांद्याचे दर गेल्या दोन दिवसात एका किलो मागे १० रुपयांनी उतरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देगेल्या दोन दिवसात एका किलो मागे १० रुपयांनी उतरले कांद्याचे दरमागणी कमी असताना आवक जास्त झाल्याने कांद्याचे दर १५ ते १८ रुपयांपर्यंत घसरले खाली

पुणे : निर्यातबंदी उठवल्यामुळे कांद्याला भाव मिळेल असे शेतकऱ्यांना वाटले होते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी माल राखून ठेवला होता. परंतु, गुलटेकडी येथील मार्केट यार्डात येणाऱ्या कांद्याचे दर गेल्या दोन दिवसात एका किलो मागे १० रुपयांनी उतरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.गेल्या तीन चार दिवसांपासून मार्केट यार्डात शंभर, सव्वाशे ते दीडशे गाडी दाखल होत होती. मात्र, बुधवारी मार्केट यार्डात २५० गाडी कांदा दाखल झाला. त्यामुळे कांद्याच्या दरात घसरण झाली. एका किलो मागे कांद्याला मिळणारा २० ते २५ चा भाव १६ ते २० रुपयांपर्यंत खाली आला आहे. केवळ पुण्यातच नाही तर सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील बाजारातही कांद्याचे दर कोसळले आहेत, असे मार्केट यार्डातील कांद्याच्या व्यापाऱ्यांनी सांगितले.कांद्याचे व्यापारी विलास रायकर म्हणाले, की गेल्या तीन ते चार दिवसांपासून कांद्याची १०० ते १५० गाडी आवक होत होती. आवक कमी असल्याने कांद्याला २० ते २५ रुपयांपर्यंत दर मिळत होता. सकाळी २२ ते २५ रुपये मिळालेला भाव दुपारंतर कमी झाल्याचेही दिसून येत होते. परंतु. बुधवारी कांद्याची २५० गाडी आवक झाली. मागणी कमी असताना आवक जास्त झाल्याने कांद्याचे दर १५ ते १८ रुपयांपर्यंत खाली घसरले. परंतु, चांगल्या प्रतिच्या कांद्याला २० रुपयांचा भाव मिळाला.

टॅग्स :onionकांदाMarket Yardमार्केट यार्डPuneपुणे